नवी दिल्ली : फिरोजशाह कोटला मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सने दिल्लीवर 4 विकेट्सने मात केली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीने कोलकात्याला विजयासाठी 168 धावांचं आव्हान दिलं होतं.


या सामन्यादरम्यान चेंडू स्टम्पवर लागूनही बाद न दिल्याने फलंदाज पॅट कमिन्ससह सर्व खेळाडूंना आश्चर्याचा धक्का बसला. कमिन्स 18 व्या षटकात कुलटर नाइलच्या गोलंदाजीचा सामना करत असताना चेंडू थेट स्टम्पवर लागला. तरीही त्याला बाद देण्यात आलं नाही.

स्टम्पवर लागलेला चेंडू थेट विकेटकीपर रॉबिन उथप्पाच्या हातात गेला. चेंडू स्टम्पवर लागलेला तर पंचांनी पाहिलं. मात्र बेल्स न पडल्याने कमिन्सला बाद देण्यात आलं नाही.

पाहा व्हिडिओ :

मनीष पांडे आणि युसूफ पठाणच्या भागीदारीने कोलकात्याला विजय मिळवून दिला. मनीष पांडेनं नाबाद 69 धावांची खेळी चार चौकार आणि तीन षटकारांनी सजवली. युसूफ पठाणनं 39 चेंडूंत सहा आणि दोन षटकारांसह 59 धावांची खेळी उभारली. कोलकात्याकडून नॅथन कूल्टर-नाईलनं प्रभावी गोलंदाजी केली. त्यानं चार षटकांत 22 धावा मोजून दिल्लीच्या तीन फलंदाजांना माघारी धाडलं.