मुंबई : रायगडच्या महाडमधील सावित्री नदीवरचा पूल 5 जून रोजी खुला होणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकात पाटील यांनी सोमवारी ही माहिती दिली.

मागील वर्षी 3 ऑगस्ट रोजी सावित्री नदीवरील पूल कोसळला होता. या दुर्दैवी घटनेत एसटी बससह काही वाहनं वाहून गेल्याने 30 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता.

आता दहा महिन्यानंतर, येत्या 5 जून रोजी हा पूल नागरिकांच्या वापरासाठी खुला करणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

सरकारच्या आश्वासनानुसार हा पूल डिसेंबर 2016 मध्येच पूर्ण होणं अपेक्षित होतं. पुण्यातील टी अँड टी लिमिटेड या कंपनीने पुलाच्या पुनर्बांधणीचं काम हाती घेतलं होतं.

नवीन पुलामध्ये अँटीक्रॅश बॅरियर आणि दोन्ही बाजूने एक मीटर रुंदीचा फूटपाथ असेल. 239 मीटर लांबीच्या तीन पदरी पुलाच्या बांधकामासाठी 27 कोटी रुपयांचा खर्च आला आहे.

संबंधित बातम्या

महाड दुर्घटना : बुडालेली एसटी बस सापडली

देवदूत… काळरात्री शेकडो जणांचा जीव वाचवणारा ढाण्या वाघ!


महाडचा ‘देवदूत’ बसंत कुमारचा राज ठाकरेंकडून सत्कार


महाड दुर्घटना: सावित्री नदीवर नेमकं काय घडलं?


LIVE : महाड पूल दुर्घटना : अंधुक प्रकाशामुळे बचावकार्य थांबलं


महाड पूल दुर्घटनेप्रकरणी दोषींवर योग्य ती कारवाई करु: मुख्यमंत्री


महाड पूल दुर्घटना : दिवसभरात काय काय घडलं?