Parth Salunkhe Becomes First Indian Archer to Win Youth World Championship in Recurve Category : साताऱ्याच्या पार्थ साळुंखे याने आर्यलँड येथे सुरु असलेल्या आर्चरी युवा वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या रिकर्व्ह श्रेणीत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. भारताने युवा आर्चरी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये आतापर्यंत 10 पेक्षा जास्त पदकांची कमाई केली आहे. ही भारताची युवा आर्चरी वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. साताऱ्याच्या पार्थ साळुंखे याने 21 वर्षाखालील वयोगटात रिकर्व्ह प्रकारात कोरियाच्या खेळाडूला पराभूत करत सुवर्णपदक जिंकले. या प्रकारात सुवर्णपदक जिंकणारा तो भारताचा पहिला तिरंदाज ठरला. पार्थने सातव्या मानांकित सोंग इंजूनला पाच सेटपर्यंत कडवी झुंज दिली. पार्थने सोंग इंजूनला 7 - 3 (26-26, 25-28, 28-26, 29-26, 28-26) असे पराभूत केलं.
पार्थ साळुंखे याने 10 पैकी 10 गुण मिळवणारे दोन तर 10 पैकी 9 गुण मिळवणारा एक निशाणा साधला. फायनलमध्ये पार्थने 5 - 3 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर दोन एक्स (एकमद मध्यभागी निशाणा साधणे) निशाणे साधत पार्थने दमदार शेवट केला. पार्थच्या यशानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पार्थ हा मूता साताऱ्याजवळील करंजेपेठचा रहिवाशी आहे. पार्थला वडिलांकडूनच आर्चरचे मार्गदर्शन मिळाले.
आयर्लंड येथील लिमरीक येथे नुकत्याच झालेल्या जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेत पार्थ साळुंखे याने सुवर्ण कामगिरी केली. पार्थ साळुंखे जुनिअर वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे. पार्थ फक्त एवढ्यावर थांबला नाही तर दुहेरीमध्येही त्याने भारताला पदक मिळवून दिलेय. मिश्र दुहेरी गटात पार्थ आणि हरियानाची रिद्धी फोर या दोघांनी मिळून कांस्य पदकाची कमाई केली. त्यामुळे आता पार्थने भारताला जागतिक स्पर्धेत दोन पदके जिंकून दिली आहेत. शनिवारी साताऱ्याची युवा महिला तिरंदाज आदिती स्वामी हिनेदेखील कंपाउंड प्रकारात विश्वविजेती होण्याचा मान मिळवलाय.