नवी दिल्ली : भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदार सिंह आणि पॅरालिम्पिक अॅथलीट देवेंद्र झाझरिया यांच्या नावांची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.
राजीव गांधी खेलरत्न हा देशातला सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे. या पुरस्कार मिळणाऱ्या खेळाडूला राष्ट्रपतींच्या हस्ते एक पदक आणि एक प्रमाणपत्रासह साडे सात लाख रुपयांची रक्कम दिली जाते.
सरदार सिंहने तब्बल 10 वर्षे आंतरराष्ट्रीय हॉकीत भारताचं प्रतिनिधित्व केलं. त्याने आठ वर्षे भारतीय संघाचं कर्णधारपद भूषवलं आहे.
तर देवेंद्र झाझरियाने 2004 आणि 2016 सालच्या पॅरालिम्पिकमध्ये भारताला भालाफेकीच्या दोन सुवर्णपदकांची कमाई करुन दिली आहे. खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस झालेला देवेंद्र हा पहिलाच पॅरालिम्पिक अॅथलीट ठरला आहे.
दरम्यान, चेतेश्वर पुजारा आणि हरमनप्रीत कौर या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंसह 17 खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. मरियप्पन थांगवेलू आणि वरुण भाटी या पॅरालिम्पिक अॅथलिट्सचाही त्यात समावेश आहे.
सरदार सिंह आणि देवेंद्र झाझरियाची 'खेलरत्न'साठी शिफारस
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Aug 2017 02:35 PM (IST)
भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदारसिंह आणि पॅरालिम्पिक अॅथलीट देवेंद्र झाझरिया यांच्या नावांची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -