पालघर : भारताचा मध्यमगती गोलंदाज शार्दुल ठाकूरच्या आई-वडिलांना अपघात झाला आहे. पालघरमध्ये बाईक घसरुन झालेल्या अपघातात दोघं जण जखमी झाले आहेत.


ठाकूर कुटुंबीय पालघरमधील माहिम गावचे रहिवासी आहेत. शार्दुलच्या आई हंसा ठाकूर आणि वडील नरेंद्र ठाकूर पालघर अल्याळीमध्ये एका लग्न समारंभाला गेले होते. लग्नानंतर माहिमच्या दिशेने येताना त्यांना अपघात झाला.

बाईक घसरुन पडल्यामुळे ठाकूर दाम्पत्य जखमी झालं. दोघांना पालघरमधील ढवळे रुग्णालयात प्राथमिक उपचारांसाठी नेण्यात आलं. त्यानंतर वडिलांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात हलवण्यात आलं.

शार्दुल सध्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्स संघातून खेळत आहे. शार्दुलने आतापर्यंत रणजी, आयपीएलमध्ये धडाकेबाज कामगिरी बजावली आहे.

पाहा व्हिडिओ :