जयपूर : सलामीवीर फलंदाज लोकेश राहुलच्या नाबाद 95 धावांच्या झुंजार खेळीनंतरही किंग्स इलेव्हन पंजाबला राजस्थान रॉयल्सकडून 15 धावांनी हार स्वीकारावी लागली. पंजाबचा हा दहा सामन्यांमधला चौथा पराभव, तर राजस्थानचा दहा सामन्यांमधला चौथा विजय ठरला.
या सामन्याअखेर आयपीएलच्या गुणतालिकेत पंजाब 12 गुणांसह चौथ्या, तर राजस्थान आठ गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.
दरम्यान, जयपूरच्या सामन्यात राजस्थानने पंजाबला विजयासाठी 159 धावांचं आव्हान दिलं होतं. लोकेश राहुलने 70 चेंडूंत अकरा चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 95 धावांची खेळी उभारली. पण दुसऱ्या टोकाने त्याला दमदार साथ लाभली नाही. त्यामुळे पंजाबवर 15 धावांनी हार स्वीकारण्याची वेळ आली.
या सामन्यातील 95 धावांच्या खेळीमुळे लोकेश राहुल ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला. दहा सामन्यांमध्ये त्याच्या खात्यात 471 धावा जमा आहेत. राहुलने 156.47 च्या स्ट्राईक रेटने या धावा काढल्या आहेत.
केएल राहुलच्या झुंजार खेळीनंतरही पंजाबचा पराभव
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 May 2018 11:51 PM (IST)
पंजाबचा हा दहा सामन्यांमधला चौथा पराभव, तर राजस्थानचा दहा सामन्यांमधला चौथा विजय ठरला. या सामन्याअखेर आयपीएलच्या गुणतालिकेत पंजाब 12 गुणांसह चौथ्या, तर राजस्थान आठ गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -