मुंबई : मैदानात भारत आणि पाकिस्तान प्रतिस्पर्धी आहेत, पण मैदानाबाहेत ते अगदीच वेगळे आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताचा पाकिस्तानकडून पराभव झाला असला तरी, टीम इंडियाच्या क्रिकेटरनी दाखवलेली माणूसकी ही कोणत्याही धर्म आणि शत्रूपेक्षा मोठी आहे.


काही दिवसांपूर्वीच महेंद्रसिंह धोनीचा पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार सरफराज अहमद यांच्या मुलासोबतचा फोटो व्हायरल झाला होता. धोनीचा प्रेमळपणा पाहून अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. इतकंच काय पाकिस्तानही चाहत्यांनीही धोनीच्या कृतीचं कौतुक केलं होतं. यानंतर आता भारतीय खेळाडूंच्या बंधुतेचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे.

पाकिस्तान क्रिकेट संघाचा सलामीवीर अझर अलीने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, युवराज सिंह आणि महेंद्रसिहं धोनीचे ट्वीटरवर आभार मानले. याचं कारण म्हणजे या त्रिकुटाने आपल्या शेड्यूलमधून थोडा वेळ काढून अझर अलीच्या मुलांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत धम्माल केली.

यानंतर अतिशय आनंदित झालेल्या अझर अलीने ट्विटरवर काही फोटो शेअर केले. भारतासोबतच पाकिस्तानी चाहत्यांनी याबाबत त्यांचं कौतुक केलं. "माझ्या मुलांसोबत वेळ घालवून त्यांना आनंद देणाऱ्या महेंद्रसिह धोनी, विराट कोहली आणि युवराज सिंह या लिजंड्सचे आभार," असं ट्वीट अलीने केलं.

https://twitter.com/AzharAli_/status/877094884813008897

अझर अलीने या तिघांसाठी अक्षरश: लिजंड्स शब्द वापरला. त्याच्या या ट्वीटमुळे दोन्ही देशांचे चाहतेही प्रभावित झाले आहेत.

कोहलीसोबत अझरचा मुलगा



धोनीसोबत अझरची मुलं



युवराजसोबत अझर अलीची मुलं



अझरच्या ट्वीटवर प्रतिक्रिया

https://twitter.com/MaheshNBhatt/status/877104705570197505

https://twitter.com/Mohsin_Bhagt/status/877104406071840769

https://twitter.com/Sand_In_Deed/status/877106194636095488

https://twitter.com/Cricprabhu/status/877127602275663873

https://twitter.com/mi78m/status/877095502554292224