सातारा : भारतासह जगभरात आज योगदिनाचा उत्साह आहे. साताऱ्यातल्या पेशाने वकील असणाऱ्या सुधीर ससाणे यांनी चक्क पाण्याखाली योग करून योग दिवस साजरा केला.


एक, दोन नाही तर तब्बल 40 योगप्रकार त्यांनी पाण्याखाली केले. डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर त्यांनी पाण्याखाली योगाचा सराव सुरु केला. तब्बल वर्षभर सराव केल्यानंतर त्यांना योगा करण्यात हे यश आलं.

21 जून हा जगभरात जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याचाच भाग म्हणून आज भारतासह जवळपास 150 पेक्षा अधिक देशांमध्ये योग दिन साजरा करण्यात आला. भारतातील प्रत्येक शहर आणि गावात योग दिनानिमित्त कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

भारतीय नौदलाने बंगालच्या उपसागरात योग दिन साजरा केला. तर जवानांनीही लडाखमध्ये योग दिन साजरा केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व केंद्रीय मंत्री, खासदार, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री आणि राजकीय नेत्यांनी योग दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला.