कार्डिफ : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या साखळी सामन्यात श्रीलंकेवर 3 गडी राखून पाकिस्ताननं सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. पाकिस्तानी कर्णधार सरफराज अहमदनं निर्णायक खेळी करुन पाकला विजय मिळवून दिला. पण याच सामन्यात क्षेत्ररक्षण करताना सरफराजचा खोटेपणाही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

सरफराजने 34व्या ओव्हरमध्ये श्रीलंकेचा अष्टपैलू असेला गुणारत्ने याचा झेल सोडला. मोहम्मद आमिरच्या गोलंदाजीवर गुणारत्नेच्या बॅटची कड लागून चेंडू किपर सरफराजकडे गेला. यावेळी सरफराजनं एक शानदार डाईव्ह मारुन झेल घेण्याचा प्रयत्नही केला. पण चेंडू त्याच्या गोल्व्ह्जमधून निसटला आणि खाली पडला. झेल सुटल्याचं स्पष्टपणे माहित असूनही सरफराजनं मैदानावरील पंचांना थर्ड अंपायरकडे रिव्ह्यू घेण्यास सांगितलं.

तिसऱ्या पंचांनी जेव्हा टीव्ही रिप्ले पाहिला त्यावेळी त्यात असं स्पष्ट दिसलं की, चेंडू सरफराजच्या हातून निसटून खाली पडलेला होता आणि नंतर सरफाराजनं तो पुन्हा उचलला. हे सर्व सुरु असताना कॅमेऱ्यानं आपलं काम चोख बजावलं होतं.

एकीकडे अनेक खेळाडू मैदानात सच्चेपणा दाखवून आपली छाप सोडतात. पण खुद्द पाकिस्तानच्या कर्णधाराला हे जमू शकलं नाही. सध्या सोशल मीडियावर त्याचा हाच व्हिडिओ व्हायरल होत आहे.

VIDEO:


सौजन्य : (अशोक डिंडा ट्विटर)