क्रिकेटमधील निवृत्तीवरून शाहिद आफ्रिदीची पुन्हा प्रतिक्रिया
पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी आपल्या निवृत्तीवरून नेहमीच चर्चेत असतो.
शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानसाठी खेळताना 98 टी20 सामन्यांमधून 1405 धावा केल्या आहेत. तर 398 एकदिवसीय सामन्यांमधून 8064 धावा केल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शाहिद आफ्रिदी तहरीक-ए-इसांफचे संचालक इमरान खान सोबत अनेक व्यासपीठांवर पाहायला मिळाला.
याचबरोबर एका चाहत्याने राजकारणातील प्रवेशासंदर्भात विचारले असता, राजकीय क्षेत्राची आपल्याला आवड असल्याचे त्याने सांगितले. पण त्याचबरोबर त्याचे अनेक हितचिंतक त्याला यापासून दूर राहण्याचाच सल्ला देत असल्याचे त्याने यावेळी नमूद केले.
आफ्रिदी स्वत:ला फिट समजत असल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळणारच असल्याची, इच्छा व्यक्त केली.
शाहिद आफ्रिदीला क्रिकेटमधील निवृत्ती संदर्भात विचारले असता, टी20 क्रिकेटमधून अद्याप निवृत्ती घेण्याचा कोणताही विचार नसल्याचे सांगितले. टी20 सोबतच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि डोमेस्टिक क्रिकेटमध्येही खेळणार असल्याचे त्याने सांगितले.
पण आफ्रिदीने आपल्या निवृत्तीवरून बीबीसी उर्दूला दिलेल्या मुलाखतीत पुन्हा भूमिका स्पष्ट केली.