खेळामुळे डिप्रेशनमधून बाहेर आले- दीपिका
दीपिकाने तरुणाईला स्वतःचा अनुभव शेअर करुन डिप्रेशन दूर करण्यासाठी खेळाचा आधार घेण्याचं आवाहन केलं आहे.
दीपिकाला वडिलांनी परफेक्ट होण्यासाठी ती डीचं सूत्र वापरण्याचं सांगितलं. डिसिप्लीन म्हणजेच शिस्त, डिटरमिनेशन म्हणजे निर्धार आणि शेवटचं डी म्हणजे डेडिकेशन अर्थात कोणत्याही कामासाठी समर्पण, या तीन डीचं सूत्र वडिलांनी सर्वश्रेष्ठ होण्यासाठी सांगितल होतं, असं दीपिका सांगते.
खेळानेच मला कधीही न थांबणारी दीपिका बनवलं आहे, असं दीपिका सांगते.
प्रत्येक मुलगा-मुलगी, स्त्री-पुरुष सर्वांनी कोणता ना कोणता खेळ खेळावा. खेळाने माझं आयुष्य बदलून टाकलं आहे. तुमचं देखील बदलू शकतं, असं आवाहन दीपिकाने केलं आहे.
दोन वर्षांपूर्वी मी वेळेशी खूप संघर्ष करत होते, आयुष्यात काही होणार नाही असं मानून जवळपास हार मानली होती, मात्र खेळाने मला या परिस्थितीला तोंड कसं द्यायचं ते शिकवलं, असं दीपिकाने म्हटलं आहे.
माझ्यातील खेळाडू वृत्ती मला नेहमी कठीण परिस्थितीला तोंड देण्याची ताकद देते, असं दीपिका सांगते.
यश-अपयश पचवणं केवळ खेळानेच शिकवलं. खेळानेच माझी नाळ जमिनिशी जोडून ठेवली आणि विनम्र बनवलं, असं दीपिकाने सांगितलं आहे.
खेळाने कठीण परिस्थितीमधून बाहेर येण्यासाठी आणि संघर्ष करण्यासाठी बळ दिलं, असं दीपिकाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दीपिका स्वतः एक बॅडमिंटन खेळाडू होती. तिने तरुणांना फेसबुकद्वारे खेळाकडे आकर्षित होण्याचं आवाहन केलं आहे.
खेळामुळे माझं जीवन बदललं, असं दीपिकाने सांगितलं आहे. जवळपास दोन वर्ष डिप्रेशनमध्ये असताना खेळाने लढायला शिकवंल, असं दीपिकाने सांगितलं आहे.