इस्लामाबाद : पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज उमर अकमल आणि गोलंदाज जुनैद खान या दोघांवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. पाकिस्तान कप वन डे स्पर्धेच्या सामन्याआधी अकमल आणि जुनैदमध्ये संघनिवडीवरुन वाद निर्माण झाला होता.
जुनैद त्या सामन्यात खेळणार नसल्याचं आपल्याला ऐनवेळी कळवण्यात आलं, असा आरोप पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचा कर्णधार अकमलनं केला होता. कर्णधार म्हणून हा माझ्यासाठी धक्का असल्याचं मत अकमलने व्यक्त केलं होतं. त्यावर जुनैदनं सोशल मीडियाद्वारा नाराजी दर्शवली होती.
'मी टीम सोडून पळालेलो नाही. मला अकमलच्या वक्तव्याची खंत वाटते' असं जुनैदने ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. 'मी टीम सोडून पळालेलो नाही. मला विषबाधा झाल्यामुळे मी हॉटेलमध्ये आराम करत होतो. टीम मॅनेजमेंटला याची माहिती असून डॉक्टरांनी माझी तपासणीही केली. त्यांनीच मला न खेळण्याचा सल्ला दिला', असं जुनैद म्हणाला.
https://twitter.com/mrsportsjourno/status/857553488355639297
या प्रकरणी पीसीबीची त्रिसदस्यीय समिती अधिक तपास करणार आहे. दोषी आढळल्यास उमर अकमल आणि जुनैद खान या दोघांवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे.