कोलंबो : श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा याने काल (26 जुलै) एकदिवसीय क्रिकेटला अलविदा केला. कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात आलेला बांगलादेशविरुद्धचा सामना मलिंगाच्या कारकिर्दीतला अखेरचा एकदिवसीय सामना ठरला. गोलंदाजीची राऊंड आर्म शैली आणि अचूक यॉर्करमुळे मलिंगाने क्रिकेटविश्वात आपला वेगळा ठसा उमटवला आहे.
निवृत्तीबाबत बोलताना मलिंगा म्हणाला की, क्रिकेटमध्ये टिकून राहण्यासाठी तुम्ही मॅचविनर असणं आवश्यक आहे. माझा कर्णधार माझ्याकडून जास्तीत जास्त विकेट्स मिळवण्याची अपेक्षा करतो. माझ्या कर्णधाराची अपेक्षा पूर्ण करण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला आहे. मला आशा आहे की, नवे युवा गोलंदाजदेखील चांगली कामगिरी करतील. नव्या गोलंदाजांनादेखील मॅच विनर व्हावं लागेल. टीममधील नव्या दमाचे गोलंदाज उत्तम खेळत आहेत. आपल्याला त्यांची चांगली देखभाल करावी लागेल.
मलिंगा म्हणाला की, मी गेली 15 वर्षे देशासाठी खेळतोय. देशासाठी खेळणं मोठ्या सन्मानाची गोष्ट आहे. मला आता वाटतं की, मी पुढे जायला हवं. आम्हाला 2023 च्या विश्वचषक स्पर्धेसाठी टीम बनवायची आहे. त्यामुळे मी थांबण्याची वेळ आली होती. आता मला जावं लागेल.
दरम्यान मलिंगाने एक दिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आपण टी-20 क्रिकेट खेळत राहणार असल्याचे म्हटले आहे. टी-20 क्रिकेट वर्ल्डकपपर्यंत टी-20 सामने खेळणार आहे. वर्ल्डकप खेळण्याची संधी मिळेल अशी आशा असल्याचे तो म्हणाला. तसेच श्रीलंकेला टी-20 वर्ल्डकप जिंकून देण्याचे माझे स्वप्न आहे, अशी प्रतिक्रियादेखील त्याने दिली. तसेच माझ्यापेक्षा उत्तम खेळाडू माझ्या जागी खेळला तर मला अधिक आनंद होईल अशी खिलाडीवृत्ती मलिंगाने आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये व्यक्त केली आहे.
नुकत्याच इंग्लंडमध्ये वर्ल्डकप स्पर्धेत श्रीलंकेचा संघ सेमी फायनल गाठू शकला नाही. वर्ल्डकप स्पर्धेत मलिंगाने 7 लढतीत 13 बळी घेतले. 2004 साली मलिंगाने एकदिवसीय क्रिकेट मध्ये पदार्पण केले. मलिंगाने श्रीलंकेकडून 225 एक दिवसीय लढतीत 335 बळी मिळवले. मुरलीधरन (523 बळी) आणि चामिंडा वास (399 बळी) नंतर श्रीलंकेकडून सर्वाधिक बळी मलिंगाच्या नावावर आहेत. तसेच 30 कसोटीत 101 बळी आणि 73 टी-30 लढतीत 97 बळींची नोंद मलिंगाच्या खात्यात आहे.
क्रिकेटमध्ये टिकण्यासाठी 'त्या' एका गोष्टीची नितांत आवश्यकता आहे : लसिथ मलिंगा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Jul 2019 04:46 PM (IST)
श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा याने काल (26 जुलै) एकदिवसीय क्रिकेटला अलविदा केला. कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात आलेला बांगलादेशविरुद्धचा सामना मलिंगाच्या कारकिर्दीतला अखेरचा एकदिवसीय सामना ठरला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -