कल्याण : कल्याण-डोंबिवलीच्या वरबजवळील गजानन पेट्रोल पंप पाण्याखाली गेला आहे. कल्याण मुरबाड रोडवरील हा पेट्रोल पंप आहे. उल्हास नदीला आलेल्या पुरामुळे परिसरात अचानक पाणी शिरलं. त्यामुळे नागरिक जीव वाचवण्यासाठी पेट्रोलपंपाच्या गच्चीवर आश्रय घेतला. याठिकाणी सुमारे 100 लोक अडकल्याची माहिती मिळली आहे.


पेट्रोलपंपावरील अनेक गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत. पेट्रोल पंपावर अडलेल्या एका व्यक्तीने एबीपी माझाशी संपर्क साधून तेथील परिस्थितीची माहिती दिली आहे. लहान मुलांसह अनेकजण काल रात्रीपासून याठिकाणी अडकले आहे. त्यांच्या रात्रीपासून खाण्या-पिण्यासाठी देखील काही मिळालेलं नाही.



एबीपी माझाच्या बातमीनंतर शिवदुर्ग ट्रेकर्सची टीम अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी निघली होती. मात्र नदीला आलेल्या पुरामुळे कल्याण ते मुरबाड जाणारा ब्रिजवर पाणी असल्यामुळे ट्रेकर्सची टीम घटनास्थळापर्यंत पोहचू शकत नाही. ट्रेकर्स टीमच्या बोट मागवल्या असून त्याद्वारे नागरिकांची सुटका होऊ शकते.


मुरबाड-टिटवाळा मार्गावर उल्हास नदीचे पाणी रायता गावात शिरलं आहे. गावकरी जवळील टेकडीवर पोहोचले आहेत. उल्हास नदीवरील ब्रिटीश कालीन पूल देखील पाण्याखाली गेला आहे.