हरारे: टीम इंडिया झिम्बाब्वेला वनडे मालिकेत व्हॉईटवॉश देण्याच्या तयारीत असताना कर्णधार धोनीला मात्र एका वेगळ्याच चिंतेनं ग्रासलं आहे. आतापर्यंत दौऱ्यावर जास्तीत जास्त फलंदाजांना खेळायला मिळालं नसल्यानं धोनी चिंतेत आहे.


 

सामना संपल्यानंतर धोनी म्हणाला की, "आतापर्यंत आम्ही तीनच फलंदाजांना खेळवू शकलो आहे. फलंदाजीमध्ये आम्हाला काही बदल करायचे आहेत. त्याविषयी संजय बांगर यांच्याशी नक्कीच चर्चा करण्यात येईल.

 

त्यामुळे आपल्या फलंदाजाना जास्तीत खेळायला मिळावं अशी धोनीच इच्छा आहे. त्यासाठी टी-20 सामन्यातही धोनी फलंदाजीत बदल करण्याची शक्यता आहे.

 

आजच्या विजयाचं श्रेय धोनीनं आपल्या गोलंदाजांना दिलं आहे. "आमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मला वाटलं होतं की ते 200 पर्यंत मजल मारतील. पण आपल्या फिरकी गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली."

 

25 धावा देत 3 बळी मिळविणाऱ्या युजवेंद्र चहलला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.