'तो' ऐतिहासिक सामना... अन् धोनीची चलाख खेळी!
यावेळी धोनीनं अगदी चलाख खेळी केली आणि त्यानं तीनही फिरकी गोलंदाजांना बॉलआऊटची संधी दिली. या सामन्यात भारताकडून सेहवाग, हरभजन आणि उथप्पा यांनी लागोपाठ तीनही चेंडू स्टम्पवर हिट केले. तर पाकिस्तानकडून यासिर अराफत, उमर गुल आणि शाहीद आफ्रिदी यांच्या एकाचाही चेंडू स्टम्पला लागला नाही आणि या सामना भारतानं बॉलआऊटमध्ये 3-0 नं जिंकला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यावेळच्या टी-20 नियमानुसार, सामना बॉलआऊटमध्ये पोहचला. ज्यामध्ये दोन्ही संघांना तीन-तीन चेंडू स्टम्पवर मारायचे होते. ही या सामन्यातील अत्यंत रोमांचक वेळ होती.
142 धावांचं आव्हान पाकिस्तान समोर होतं. मात्र, मर्यादित 20 षटकात पाकिस्तानी खेळाडू देखील 141 धावांच करु शकले आणि सामना बरोबरीत सुटला.
असाच एक सामना आजच्याच दिवशी 14 सप्टेंबर 2007 रोजी टी-20 विश्वचषकात पाहायला मिळाला होता. द. आफ्रिकेच्या डरबनमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला होता. या सामन्यात भारतानं 9 गड्यांच्या मोबदल्यात 141 धावांची खेळी केली होती.
क्रिकेटच्या मैदानात जेव्हा भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ एकमेकांसमोर उभे ठाकतात त्यावेळी हा महामुकबला पाहण्यासाठी प्रत्येकजण आसुसलेला असतो. या सामन्याची लोकप्रियता देखील प्रचंड असते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -