...म्हणून आर्चीने शाळा सोडली !
29 एप्रिलला ‘सैराट’ रिलीज झाला. सिनेमाने ‘सैराट’ कामगिरीही केली. आर्ची म्हणजे रिंकू रातोरात स्टार झाली. रिंकूने ‘सैराट’मधल्या आर्चीला स्पर्श केला आणि भूमिकेचं सोनं झालं. आता तिच्यासाठी दहावीचा टर्निंग पॉईंट आहे. मात्र आता ती बाहेरुन परीक्षा देणार आहे.
आर्ची जिथे जाईल तिथे प्रचंड गर्दी जमते. त्यामुळे तिला शाळेत जाणेही अवघड झालं होतं. एकंदरीत रिंकूला तिच्या प्रसिद्धीचा एक फटकाच बसल्याचं दिसून येतंय.
रिंकू राजगुरु अकलूजच्या जिजामाता कन्या विद्यालयात शिकत होती. सिनेमामुळे तुफान प्रसिद्धी मिळालेली 'आर्ची' यंदा दहावीत गेली. नववीत तिला 84 टक्के गुण मिळाले. मात्र आता तीने शाळेतूनच नाव काढून घेतलं आहे.
प्रचंड प्रसिद्धी आणि सध्या मिळत असलेली कामं, यामुळे आर्चीने शाळा सोडली आहे. रिंकूने 17 नंबरचा फॉर्म भरला असून, ती घरी अभ्यास करुन बाहेरून परीक्षा देणार आहे.
सैराट सिनेमामुळे घराघरात पोहोचलेली आर्ची अर्थात रिंकू राजगुरु यंदा दहावीत शिकत आहे, मात्र आर्चीने आता शाळेलाच रामराम केला आहे. आर्चीने 30 जूनला शाळा सोडली आहे.