Vinesh Phogat Appeal पॅरिस : विनेश फोगाटनं (Vinesh Phogat) पॅरिस ऑलिम्पिकच्या (Paris Olympics) ५० किलो वजनी गटात फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात अंतिम फेरीत धडक दिली होती. अंतिम फेरीपूर्वी करण्यात आलेल्या वजनाच्या चाचणीत ५० किलो पेक्षा तिचं वजन १०० ग्रॅम अधिक ठरल्यानं तिला निलंबित करण्यात आलं आणि शेवटच्या स्थानी ठेवण्यात आलं. या प्रकरणामुळं विनेश फोगाटसह संपूर्ण देशवासियांना मोठा धक्का बसला होता. यानंतर विनेश फोगाटनं या प्रकरणी 'कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स' (CAS) मध्ये धाव घेतली होती. सीएएसनं त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार ऑलिम्पिक संपण्यापूर्वी निर्णय येऊ शकतो. या प्रकरणातील सुनावणी आज पूर्ण होणार असून अंतिम निर्णयासाठी वाट पाहावी लागेल.
सीएएसनं त्यांच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी म्हणजेच आजच सुनावणी पूर्ण होणार आहे. या प्रकरणी अंतिम निर्णय ऑलिम्पिक स्पर्धा संपण्यापूर्वी अंतिम निर्णय येईल अशी अपेक्षा असल्याचं म्हटलं . हे प्रकरण एका तासात ऐकून निर्णय घेण्यासारखं नाही. विनेश फोगाटनं या प्रकरणात तातडीनं निवेदन केलं नाही मात्र, प्रक्रिया वेगात पुढं जाईल, असं सीएएसनं म्हटलं.
विनेशची दमदार कामगिरी
विनेश फोगाटनं उपांत्यपूर्व फेरी आणि उपांत्य फेरी जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. उपांत्य फेरीत क्यूबाची पैलवान यस्नेलिस गुजमान लोपेझला 5-0 नं पराभूत करत विजय मिळवला होता. विनेश फोगाटनं उपांत्यपूर्व फेरीत यूक्रेनच्या ओखसाना लिवाचला ७-५ नं पराभूत केलं होतं. त्यापूर्वी जपानच्या सुवर्णपदक विजेत्या यूई सुसाकी हिला ३-२नं पराभूत केलं होतं. मात्र, अंतिम फेरीपूर्वी विनेश फोगाटला निलंबित करण्यात आलं.
निलंबनाविरोधात विनेशची धाव
विनेश फोगाटनं निलंबित झाल्यानंतर 'कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स'मध्ये याचिका दाखल केली आहे. विनेश फोगाटनं वजन कमी करण्यासाठी सर्व प्रयत्न केले मात्र तिला यश आलं नाही. वजन जास्त नोंदवलं गेल्यानं तिनं अखेर सीएएसमध्ये धाव घेतली.
सीएएसचं काम कसं चालतं?
पहिलं ऑलिम्पिकमध्ये १८९६ मध्ये ग्रीसमध्ये खेळवलं गेलं होतं. मात्र, यानंतर काही वर्षांनी वाद निर्माण झाले होते. काही खेळाडूंनी नियमांबाबत प्रश्न उपस्थित केले होते. या वादांवर निर्णय घेण्यासाठी 'कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स' ची निर्मिती करण्यात आली होती. सीएएसची स्थापना1984 करण्यात आली होती. याचं मुख्यालय स्वित्झरलँडमध्ये आहे. ही एक स्वायत्त संस्था असून निर्णय स्वतंत्रपण घेत असते.
संबंधित बातम्या :