Tokyo Olympics 2020 : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाच्या सुवर्णपदकाच्या आशा मावळल्या असल्या तरी, आजचा दिवस अत्यंत खास असणार आहे. कारण आज पहिलवान रवि दाहिया सुवर्णपदक, तर भारतीय पुरुष हॉकी संघ कांस्य पदकावर नाव कोरण्यासाठी मैदानावर उतरणार आहे.
यासोबतच आज दीपक पुनिया, विनेश फोगाट यांच्यावरही साऱ्यांच्या नजरा असतील. तसेच आज ज्या सामन्यावर साऱ्या भारतीयांच्या नजरा लागल्या आहेत, तो म्हणजे, पुरुषांची फ्री स्टाईन कुस्तीचा 57 किलोग्राम वर्ग. रवि दाहिया अंतिम सामन्यात रशियाच्या ऑलिम्पिक कमिटीच्या वतीनं यंदा टोकियोत खेळणाऱ्या पहिलवान जावूर उगुएवच्या विरोधात मैदानावर उतरणार आहे.
रवि दाहियाकडून देशाला सुवर्णपदकाच्या अपेक्षा
या सामन्यात भारताकडे टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिलं सुवर्णपदक जिंकण्याची संधी आहे. रवि दाहिया सध्या फॉर्मात असल्याचं पाहायला मिळत आहे. संपूर्ण देशाला सोनीपतच्या नाहरी गावात राहणाऱ्या या पहिलवानाकडून सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. हा सामना दुपारी 3 वाजून 45 मिनिटांच्या आसपास सुरु होईल.
पुरुष हॉकी संघासाठी सुवर्णपदकाच्या आशा मावळल्या असल्या तरी, 41 वर्षांनी सेमीफायनल्स गाठलेल्या हॉकी संघासाठी कांस्य पदकंही कमी नाही. कांस्य पदकावर नाव कोरण्याच्या आशेसह आता भारतीय पुरुष हॉकी संघ आद जर्मनीशी लढणार आहे. हा सामना सकाळी 7 वाजता सुरु होईल.
53 किलोग्राम फ्रीस्टाइल कुस्तीत विनेश फोगाट मॅटवर उतरणार
संध्याकाळी जवळपास 4 वाजता कुस्तीच्या फ्रीस्टाइल स्पर्धेसाठी 86 किलोग्राम गात दीपक पुनिया कांस्य पदकासाठी मॅटवर उतरणार आहे. यापूर्वी बुधावाी दीपकचा सेमीफायनल्समध्ये पराभव झाला होता. याव्यतिरिक्त आज महिलांच्या 53 किलोग्राम फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये विनेश फोगाट मॅटवर उतरणार आहे. दरम्यान, आज सकाळी 8 वाजता पहिला सामना होणार आहे.
ऑलिम्पिकच्या तेराव्या दिवसासाठी भारताचा कार्यक्रम (भारतीय वेळेनुसार) अशाप्रकारे...
हॉकी
7 am : पुरूष हॉकी, कांस्य पदकासाठी, भारत आणि जर्मनी यांच्यात लढत
कुस्ती
7:30 am : अंशु मलिक, 57kg फ्री स्टाइल (रेपोचेज)
8 am : विनेश फोगाट, 53 kg वजनी गटात फ्री स्टाइल, पहिला राऊंड
3:45 pm : रवि दहिया Vs जावूर उगुएव, रशियन पहिलवान, 57 kg वजनी गटात फ्री स्टाइल, सुवर्णपदकासाठी
4 pm : दीपक पुनिया, 86 kg वजनी गटात फ्री स्टाइल कुस्ती, कांस्य पदकासाठी
महत्त्वाच्या इतर बातम्या :