Tokyo Olympics 2020 Day 1 Live Updates: जपानची राजधानी टोकियो येथे आजपासून ऑलिम्पिक खेळांना सुरुवात झाली आहे. कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे ऑलिम्पिक खेळ एका वर्षासाठी रद्द करण्यात आले होते. पण एका वर्षानंतर ओलिंपिक कोरोना महामारी सुरू असताना खेळवली जात आहे. टोकियो ऑलिम्पिक 2021 चा उद्घाटन सोहळा सुरू झाला आहे. कोरोना साथीमुळे या समारंभात भारतातील 22 खेळाडू सहभागी झाले आहेत. त्यांच्यासमवेत या सोहळ्यास 6 अधिकारीही सहभागी झाले आहेत.


टोकियो ऑलिम्पिकच्या विरोधात निषेध
कोरोना विषाणूचा कहर सुरु असताना जपानमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेला विरोध सुरू झाला आहे. निषेध करणारे लोक म्हणतात की ऑलिम्पिक खेळांमुळे टोकियोमध्ये कोरोना विषाणूची प्रकरणे वाढू लागली आहेत. निषेध नोंदविणारे लोक ऑलिम्पिक खेळ रद्द करण्याची मागणी करीत आहेत.


कोरोना आजारामुळे ऑलिम्पिक खेळांमध्ये बरेच मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. खेळाडूंना कोरोना विषाणूच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी अतिशय कठोर बायो बबल (जैव सुरक्षा कवच) तयार केला गेला आहे. इतकेच नाही तर टोकियो ऑलिम्पिक प्रेक्षकांशिवाय मैदानावर खेळला जात आहे.


कोरोना संसर्गाने खेळाडूंच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढवल्या आहेत. कोरोना महामारीमुळे खेळाडूंना दररोज कोविड 19 चाचणीतून जावे लागणार आहे. कोविड 19 चाचणी अहवालाशिवाय कोणत्याही खेळाडूला मैदानावर प्रवेश मिळणार नाही. इतकेच नाही तर एखाद्या खेळाडूने अंतिम फेरी गाठली असेल आणि त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असेल तर त्याला पदकाच्या शर्यतीतून माघार घ्यावी लागेल.


तिरंदाजीतून भारत मोहीम सुरू करणार
भारतातातर्फे टोकियो ऑलिम्पिकमध्ये 125 खेळाडू भाग घेत आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताचे तिरंदाजी आणि बॉक्सिंग खेळाडू मैदानात उतरतील. भारताची स्टार आर्चर दीपिका कुमारी ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी नशीब आजमावत आहे. दीपिका कुमारीकडून भारताला सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे.


याशिवाय तरुणदीप राय, अतनू दास आणि प्रवीण जाधव हेदेखील तिरंदाजीत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेच्या पहिल्या दिवशी तीन भारतीय बॉक्सर लव्हलिना, विकास कृष्णन आणि सतीश कुमार स्वतंत्र स्पर्धांमध्ये भाग घेतील.