Tokyo Olympics 2020  : भारताला टोकियो इथं सुरु असलेल्‍या ऑलिम्पिक स्पर्धेत  गुरुवारी सुवर्णपदकाने हुलकावणी दिली.  कुस्तीमध्ये पैलवान रवि दहियाकडून सुवर्णपदकाची अपेक्षा केली जात होती, पण त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. कुस्तीत रवि दहियानं पुरुष फ्रीस्टाइल 57 किलो गटात रविनं रौप्यपदक जिंकले आहे.


 रवि कुमार दहियाचा सामना रूसीचा पैलवाना जवुर यूगेव सोबत होता. पुरुष फ्रीस्टाइल 57 किलो गटात  रविनं हे यश मिळवलं आहे. रौप्य पदक जिंकल्यानंतर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी चार कोटी रुपयाचे बक्षिस जाहीर केले आहे. सामन्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील पैलवान रवि दहियाचे अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "रवि कुमार दहिया एक उत्कृष्ट पैलवान आहे. टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. भारताला त्यांचा अभिमान आहे."






रशियन ऑलिंपिक कमिटीच्या जावूर युगुयेवशी झाला, पण युगुयेवने ही लढत 7-4ने जिंकली. पुरुष फ्रीस्टाइल 57 किलो गटात रविनं हे यश मिळवलं आहे. भारताचे कुस्तीपटू रवि दहिया, दीपक पुनियानं आपापल्या गटात शानदार एकतर्फी विजय मिळवत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला होता. 


कुस्तीमध्ये हे भारताने दुसरे रौप्य पदक जिंकले आहे. या अगोदर सुशील कुमारने भारताला ऑलिम्पिकमध्ये 2012 मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये हे भारताचे दुसरे रौप्य पदक आहे. या अगोदर मीराबाई चानूने देशाला रौप्य पदक दिले आहे. टोकियो ऑल्मिपिक 2020 मध्ये भारताने आतापर्यंत दोन रौप्य पदके जिंकली आहे. आतापर्यंत नेमबाज अभिनव बिंद्रा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारे एकमेव खेळाडू आहे. अभिनव बिंद्राने बिजींग ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर रायफल गटाक 2008 मध्ये सुवर्णपदक मिळवले होते.