नवी दिल्ली : पीव्ही सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. सिंधूने रविवारी झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत चीनच्या खेळाडूचा पराभव करुन ही कामगिरी केली. सिंधू ऑलिम्पिकमध्ये सलग दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू बनली आहे. या ऑलिम्पिकमधील भारताचे हे दुसरे पदक आहे.  पीव्ही सिंधूने चीनची खेळाडू बिंग जिओचा 21-13, 21-15 असा पराभव करत कांस्यपदक जिंकले. त्यानंतर पीव्ही सिंधूने 'एबीपी' ला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली आहे.


प्रश्न : दोन ऑलिम्पिक दोन मेडल मिळाल्यानंतर तुला कस वाटतय?
उत्तर : ही माझ्यासाठी आणि देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. आत स्पर्धा  आणि अपेक्षा देखील वाढल्या आहेत. 


प्रश्न : हा  प्रवास तुझ्यासाठी किती कठीण होता?
उत्तर : नक्कीच हा प्रवास माझ्यासाठी कठीण होता. गेली पाच वर्षे मी यासाठी प्रचंड मेहनत घेतली. कोरोना महामारीमुळे सराव करणे कठीण गेले. सरकारने आणि बॅडमिंटन ऑथोरेटीने खूप सहकार्य केले.


प्रश्न : मैदानात खेळताना प्रेक्षकांना मिस केले का ?
उत्तर : हो प्रेक्षकांना खूप मिस केले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांविना सामने खेळवण्यात आले. पण मला खात्री आहे की, व्हर्च्युअली तुम्ही मला आशिर्वाद मिळाले. मी त्यासाठी सगळ्यांची आभारी आहे


प्रश्न : पॅरिससाठी काय तयारी आणि अपेक्षा आहे?
उत्तर : सध्या तरी मी आता हा क्षण जगणार आहे. मी पॅरिससाठी खेळणार असून आणि त्यासाठी मेहनत घेणार असून त्यासाठी प्रयत्न घेणार आहे. 


पीव्ही सिंधूने रचला इतिहास 
या विजयासह पीव्ही सिंधू ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. अनुभवी कुस्तीपटू सुशील कुमार बीजिंग 2008 गेम्समध्ये कांस्यपदक आणि लंडन 2012 गेम्समध्ये रौप्य पदक जिंकून ऑलिम्पिकमध्ये दोन वैयक्तिक पदके जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू बनला होता. 


प्रश्न : भारतीय   हॉकी महिला आणि पुरुष संघासाठी मेसेज काय देशील ?
उत्तर : मी दोन्ही संघाचे अभिनंदन केले आहे. दोन्ही संघांना पुढील सामन्यासाठी माझ्याकडे शुभेच्छा. आपण आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली कामगिरी केली आहे. 


संबंधित बातम्या :


PV Sindhu Parents Reactions: पीव्ही सिंधूच्या टोकियो ऑलिम्पिकमधील विजयानंतर आई-वडिलांची पहिली प्रतिक्रिया


PV Sindhu Wins Bronze Medal: पीव्ही सिंधूचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन म्हणाले..