मुंबई : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली. सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी ती दुसरी भारतीय खेळाडू आहे. सिंधूच्या या अभिमानास्पद कामगिरीनंतर सर्वच जण तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. तिची सविस्तर प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. एबीपी माझाही सिंधूशी एक्स्क्लुझिव्ह बातचित करणार आहेत. 


आज संध्याकाळी 7 वाजता पी व्ही सिंधूची खास मुलाखत प्रेक्षकांना एबीपी माझावर पाहता येणार आहे. दोन ऑलिम्पिक पदकं जिंकण्याचा तिचा प्रवास सोपा नव्हता. मेहनत, सातत्य, सराव यातून तिला ही ऐतिहासिक कामगिरी करणे शक्य झालं आहे. तिच्यासोबतच्या गप्पांमध्ये तिच्या खेळासंबंधी, मेहनतीसंबंधीचे अनेक पैलू प्रेक्षकांच्या समोर येणार आहेत. त्यामुळे ही मुलाखत प्रेक्षकांसाठीही खास असणार आहे.






कुठे पाहता येईल मुलाखत? 


एबीपी माझा लाईव्ह- https://marathi.abplive.com/live-tv/amp


एबीपी माझा यूट्यूब लाईव्ह- https://www.youtube.com/watch?v=I6zGBF72o7M 


कांस्य पदकासाठीच्या सामन्याचा थरार


जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या सिंधूने मुसाहिनो फॉरेस्ट स्पोर्ट्स प्लाझा येथे 53 मिनिटे चाललेल्या सामन्यात चीनची खेळाडू बिंग जिओचा 21-13, 21-15 असा पराभव केला. सिंधूला उपांत्य फेरीत चायनीज तैपेईच्या ताइ जू यिंगकडून 18-21, 12-21 असे पराभूत व्हावे लागले होते. मात्र, त्याने कांस्यपदकासह आपला ऑलिम्पिक प्रवास पूर्ण केला.