पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची पैलवान विनेश फोगट  (Vinesh Phogat)  आणि क्यूबाची पैलवान युस्नेलिस गुझमान यांच्यात उपांत्य फेरीची लढत पार पडली. 50 किलो महिला फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात विनेश फोगटनं उपांत्य फेरीत धडक दिली होती. उपांत्य फेरीत विनेश फोगटची लढत क्यूबाची पैलवान वाय. गुझमन हिच्यासोबत होणार आहे. उपांत्य फेरीत विनेश फोगटनं वाय. गुझमान हिला 5-0 असं पराभूत करत अंतिम फेरीत धडक दिली आहे. ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत धडक मारणारी विनेश पहिली भारतीय पैलवान ठरली आहे. 


कसा रंगला सामना ?


विनेश फोगटनं सुरुवातीपासून आक्रमकपणे खेळ सुरु केला होता. वाय. गुझमान बचावात्मक खेळ करत होती. त्यामुळं तिला 30 सेकंदांचा वेळ देण्यात आला होता. त्यात देखील ती गुण मिळवू शकली नाही, त्यामुळं विनेश फोगटला पहिला गुण मिळाला.मॅचच्या पूर्वार्धात विनेश फोगट 1-0 नं आघाडीवर होती.  मॅचच्या दुसऱ्या टप्प्यात क्यूबाच्या वाय. गुझमाननं पलटवार करण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या टप्प्यात विनेश फोगटला 30 सेकंदांचा वेळ गुण घेण्यासाठी देण्यात आला. यामध्ये विनेश फोगटनं 2 गुण घेत आघाडी 3-0 अशी केली.  पुन्हा 2 गुण मिळवत विनेशनं आघाडी 5-0 अशी केली.


भारताची पैलवान विनेश फोगट हिनं दोन मॅच जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. विनेश फोगट भारताकडून  50 किलो वजनी गटात फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात खेळते. यूक्रेनच्या ओकासाना लिवाच हिचा 7-5 पराभव करत विनेश फोगटनं उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्यासाठी विनेश फोगटमध्ये समोर जपानच्या यूई सुसाकीचं आव्हान होतं. आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये एकाही सामन्यात पराभूत न झालेल्या युई सुसाकीला विनेश फोगटनं पराभूत केलं. 


यूक्रेनची ओकासाना लिवाच हिचा 7-5 पराभव करत विनेश फोगटनं उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला होता.  विनेश फोगटनं जपानच्या दोनवेळा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या आणि वर्ल्ड चॅम्पियन युई सुसाकी चा 3-2 असा पराभव केला. विनेश फोगटनं युई सुसाकीला पराभूत करत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मोठा उलटफेर केला आहे. 


दरम्यान, विनेश फोगट यापूर्वी 53 किलो वजनी गटातून कुस्ती खेळत होती. यावेळी ती  50 किलो वजनी गटातून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाली होती.


संबंधित बातम्या :


Vinesh Phogat : विनेश फोगटनं कमाल केली, पाऊण तासात दोन पैलवान चितपट, ऑलिम्पिकच्या सेमी फायनलमध्ये धडक