Manu Bhaker Dance Video नवी दिल्ली: मनू भाकरनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत दोन कांस्य पदकं मिळवून दिली. मनू भाकरच्या यशाचा देशभरात मोठा जल्लोष करण्यात आला. मनू भाकरचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये ती शाळकरी मुलांसाबोत 'काला चष्मा' या गाण्यावर नृत्य करताना पाहायला मिळते. मनू भाकरच्या सन्मानासाठ वेलम्मल नेक्सस ग्रुपनं एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात मनू भाकरनं डान्स केला. 


मनू भाकरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर अनेकांनी शेअर केला आहे. या व्हिडीओत मनू भाकर तिच्या शेजारी उभ्या असलेल्या मुलीच्या डान्सच्या स्टेप्स पाहून आश्चर्यचकीत होते. त्यानंतर काही वेळातच ती त्या मुलींसोबत डान्स करताना पाहायला मिळते. मनू भाकरचा अनोखा अंदाज लोकांना आवडत आहे. मनू भाकरनं या कार्यक्रमात देखा तून पहली-पहली बार वे गाणं म्हटलं. यावर देखील नेटकऱ्यांनी चांगल्या कमेंट केल्या आहेत. 



पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला दोन कांस्य पदकं मिळवून देणाऱ्या मनू भाकरनं इन्स्टाग्राम स्टोरीवर रक्षाबंधन हा सण साजरा करतानाची स्टोरी शेअऱ केली होती. सुट्टीच्या काळात आईकडून स्वयंपाक शिकणार असल्याचं देखील ती म्हणाली. पीटीआयशी बोलताना मू भाकरनं तिला डान्स करायला आवडतं, असं म्हटलं होतं. तर, भविष्यात मार्शल आर्ट्सचं प्रशिक्षण सुरु ठेवणार असल्याचं देखील ती म्हणाली. याशिवाय घोडेस्वारी आणि डान्सिंग हे छंद असल्याचं तिनं म्हटलं होतं.  



मनू भाकर भारताच्या स्वातंत्र्यानंतर एका ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी पहिली खेळाडू ठरली आहे. तिनं 10 मीटर एअर पिस्टल स्पर्धेत कांस्य पदक जिंकलं होतं. त्यानंतर,  मिश्र दुहेरी पिस्टलच्या नेमबाजी स्पर्धेत मनू भाकर आणि सरबजोत सिंह यांनी कांस्य पदक जिंकलो हतो. तिला तिसरं पदक जिंकण्याची देखील संधी होती. मात्र, 25 मीटर पिस्टल नेमबाजी स्पर्धेत ती चौथ्या स्थानी राहिली.  


संबंधित बातम्या :



Ishan Kishan : 'इशान किशनला टीम इंडियात जागा नाही, त्याने...' पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरचं वादग्रस्त विधान