ऑलिम्पिकमध्ये मेक्सिकन स्विमर्सचा अक्षयच्या गाण्यावर परफॉर्मन्स
एबीपी माझा वेब टीम | 16 Aug 2016 09:52 AM (IST)
रिओ दी जनैरो : बॉलिवूडमधील खान मंडळींसोबतच सुपरस्टार अक्षयकुमारलाही जगभरात प्रचंड फॅन फॉलोईंग आहे. रिओ ऑलिम्पिकमधल्या एका उदाहरणामुळे ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. मेक्सिकन स्विमर्सनी चक्क अक्षयच्या एका गाण्यावर त्यांचा परफॉर्मन्स दिला आहे. 15 ऑगस्टला रिओ ऑलिम्पिक्समध्ये झालेल्या या स्पर्धेत मेक्सिकोच्या दोन जलतरणपटूंनी हा सिंक्रोनाईज्ड स्विमिंग परफॉर्मन्स दिला. करेम अचाच आणि नुरिया दिओसदादो अशी या खेळाडूंची नावं आहेत. खट्टा मीठा चित्रपटातील 'आयला रे आयला' या गाण्यावर दोघांनी स्विमिंग पूलमध्येच कसरती केल्या. दलेर मेहंदी आणि कल्पना पटौरी यांनी हे गाणं गायलं असून प्रीतमने संगीतबद्ध केलं आहे. पाहा व्हिडिओ : https://twitter.com/atulkasbekar/status/765222578625609729