मुंबई :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगांवकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात जाऊन अजित पवार यांची भेट घेतली.

 

नांदगावकर हे चक्क राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात दाखल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र बाळा नांदगावकर हे घरगुती कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यासाठी आल्याचं सांगण्यात आलं.

 

नांदगावकर यांनी अजित पवारांसह अनेक नेत्यांना कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं.