मुंबई : रिओ ऑलिम्पिक स्पर्धांच्या तोंडावर भारताला आणखी एक धक्का बसला आहे. भारताचा धावपटू धर्मबीर सिंग उत्तेजक तपासणीत दोषी आढळून आला आहे.

 

 

गेल्या महिन्यात बंगळुरुमध्ये झालेल्या इंडियन ग्रांप्रीत धर्मबीरनं 200 मीटर शर्यत जिंकून ऑलिम्पिकचं तिकीट मिळवलं होतं. त्या स्पर्धेदरम्यान घेण्यात आलेल्या उत्तेजक तपासणीत धर्मवीरच्या अ नमुन्यात प्रतिबंधित द्रव्याचा अंश आढळून आला आहे.

 
11 जुलै रोजी ही तपासणी झाल्याचं वृत्त आहे. मात्र नाडा आणि अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियानं अद्याप या वृत्ताला दुजोरा दिला नाही. 27 वर्षीय धर्मवीर मंगळवारी रिओला रवाना होणार होता. मात्र त्याला ऐनवेळी थांबवण्यात आलं.

 
यापूर्वी 2012 साली एका उत्तेजक तपासणीला गैरहजर राहिल्याप्रकरणी धर्मवीरला आंतरराज्य स्पर्धेतील 100 मीटर शर्यतीचं सुवर्णपदक गमवावं लागलं होतं.