पीक विम्यासाठी अर्ज भरण्यास 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
एबीपी माझा वेब टीम | 03 Aug 2016 01:12 PM (IST)
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री आणि कृषी राज्यमंत्री यांचे प्रयत्नांना व केंद्राकडे केलेल्या अथक पाठपुराव्याला यश आले आहे. पीक विमा योजनेचे अर्ज भरण्यास 10 ऑगस्ट 2016पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. या संदर्भातील केंद्राचे पत्र नुकतेच राज्य सरकारला प्राप्त झाले आहे. पीक विम्यासाठी अर्ज करण्यास शेतकऱ्यांना 31 जुलै 2016 पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, प्रत्येक राज्यातून विशेष करून महाराष्ट्रातून यासाठी दाखल होत असलेल्या अर्जांचा विचार करून, पीक विमा योजनेला मुदत वाढ देण्यात आली आहे. पीक विम्यासाठी मुदत वाढ मिळावी यासाठी काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील होते. त्यांच्या मागणीला केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या योजनेला मुदतवाढ दिली आहे. पीक विमा योजनेची वैशिष्ट्य ♦ पंतप्रधान पीक विमा योजनेचं हे पहिलं वर्ष ♦ आधीच्या योजनेत शेतकऱ्याचा हफ्ता कमी केला गेला, विमा कवच वाढवलं गेलं असे काही मोठे बदल केले गेले. ♦कर्जदार शेतकऱ्यांना अनिवार्य तर बिगर कर्जदारास ऐच्छिक असते. ♦ राज्यात 6 विभाग केले आहेत. ♦ 4 विमा कंपन्यांची नेमणूक आहे. संबंधित बातम्या