Kohli ODI Half Century Record : क्रिकेटच्या अध्यायात दिवसागणिक विक्रमांवर विक्रम करत असलेल्या किंग विराट कोहलीने आणखी एक पराक्रम आपल्या नावे केला आहे. वर्ल्डकपच्या इतिहासात सलामीवीर नसतानाही सर्वाधिक धावा ठोकण्याचा पराक्रम आपल्या नावे केला आहे. एकाच वर्ल्डकप एडिशनमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीमध्येही कोहली प्रथम क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने सचिन तेंडुलकरचा 673 धावांचा विक्रम मोडित काढत हा विक्रम आपल्या नावे केला आहे.






विराटने वर्ल्डकपमध्ये 10 पैकी आठ सामन्यात पन्नासहून अधिक धावा केल्या आहेत. यावरून किंग कोहलीचा धमाका दिसून येतो.






आजवर विराटने प्रत्येक विक्रम आपल्या नावे केला असला, तरी त्याला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सेमीफायनलमध्ये मोठी खेळी करण्यात अपयश आलं होतं. मात्र, ती कसर सुद्धा विराटने भरून काढली आहे.






त्याने आज न्यूझीलंडविरुद्धच्या महामुकाबल्यात शानदार अर्धशतकी खेळी केली असून तो शतकाकडे वाटचाल करत आहे. 






एकदिवसीय विश्वचषकाच्या बाद फेरीत विराट कोहलीने प्रथमच अर्धशतक झळकावले आहे. त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील हे 72 वे अर्धशतक आहे. कोहलीने 59  चेंडूंत चार चौकारांच्या मदतीने अर्धशतक झळकावले.






इतर महत्वाच्या बातम्या