Sri Lanka vs Pakistan Innings Highlights: जगातील सर्वोत्तम वेगवान माऱ्यांपैकी एक असलेल्या पाकिस्तानच्या ((ICC Cricket World Cup 2023) वेगवान गोलदाजीचा सामना करत श्रीलंकेनं 344 धावांचा डोंगर उभा केला. कुसल मेंडिसने झळकावलेल्या विक्रमी शतकानंतर सदीरा समराविक्रमाने सुद्धा झळकावलेल्या शतकाच्या जोरावर श्रीलंकेला मोठी धावसंख्या उभारता आली. कुसल परेरा लवकर बाद झाल्यानंतर कुसल मेंडिसने डाव आपल्या हाती घेतला. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या पॉवरप्लेमध्ये 8 षटकारांसह आपण काय करू शकतो हे दाखवून दिले होते. आज त्याने आणखी एक चांगली कामगिरी केली. सुरुवातीला निसांकासोबत डाव सावरला. 

वर्ल्डकपच्या (ICC Cricket World Cup 2023) सलामीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं धावांचा डोंगर रचल्यानंतर जोरदार प्रतिकार केलेल्या श्रीलंकेनं (Pakistan vs Sri Lanka) आपला फलंदाजीतील तोच धबधबा दुसऱ्या सामन्यातही कायम ठेवला. कुसल मेंडिस पाकिस्तानचा वेगवान मारा चोपून काढत विक्रमी शतकाची नोंद केली. मेंडिसने अवघ्या 65 चेंडूत शतक ठोकत श्रीलंकेकडून वर्ल्डकपच्या इतिहासात (ICC Cricket World Cup 2023) सर्वात वेगवान शतक करण्याचा मान मिळवला. यापूर्वी श्रीलंकेकडून कुमार संगकाराने 2015 मध्ये 70 चेंडूत शतक ठोकले होते.

सलामीवीर कुसल परेरा स्वस्तात बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या मेंडिस आणि पाथुम निसंकाने दुसऱ्या विकेटसाठी 102 धावांची भागीदारी केली. निसंका 51 धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या सादेरा समरविक्रमाने सुद्धा कुसल मेंडिसला उत्तम साथ दिली. मेंडिसने वेगवान शेती खेळी केली. अशी कामगिरी करणारा तो श्रीलंकेचा पहिलाच फलंदाज ठरला. मेंडिस 122 धावा करून बाद झाला. त्याने 122 धावांच्या खेळीत 77 चेंडूचा सामना करताना 14 चौकार आणि सहा षटकारांची आतषबाजी केली. 

मधल्या फळीतील सादिरा समराविक्रमाने 89 चेंडूत 108 धावांची खेळी केली.  पकिस्तानकडून आज वेगवान मारा सपशेल फेल ठरला. शाहीन आफ्रिदीने 9 षटकांत 66 धावा दिल्या आणि 1 बळी मिळवता आला. हसन अलीने 71 धावा देत 4 चार विकेट घेतल्या.  मोहम्मद नवाजने 62 धावा देत 1 विकेट घेतली. हॅरिस रौफने 64 धावा देत 2 विकेट घेतल्या. शादाबने 55 धावा देत 1 बळी घेतला. 

वर्ल्डकपमध्ये श्रीलंकेची सर्वोच्च धावसंख्या

398/5 वि. केनिया, कँडी, 1996३६३/९ वि एससीओ, होबार्ट, 2015344/9 वि पाकिस्तान, हैदराबाद, 2023*338/6 वि वेस्ट इंडिज, चेस्टर-ले-स्ट्रीट, 2019

वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्धची सर्वोच्च धावसंख्या

344/9 श्रीलंका, हैदराबाद, 2023*336/5, भारत, मँचेस्टर, 2019334/9, इंग्लंड नॉटिंगहॅम, 2019310/8, ऑस्ट्रेलिया जोहान्सबर्ग, 2003

वर्ल्डकप सामन्यात श्रीलंकेसाठी दोन शतकांची भागीदारी

वि केनिया, कँडी 1996वि बांगलादेश, मेलबर्न 2015वि इंग्लंड, वेलिंग्टन 2015विरुद्ध पाकिस्तान, हैदराबाद 2023*

इतर महत्वाच्या बातम्या