Mahendra Singh Dhoni: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) निवृत्ती घेतल्यानंतर त्यांची लँडमार्क असलेली जर्सी क्रमांक10 निवृत्त करून त्याचा सन्मान केला होता. आता तोच मान टीम इंडियाचा यशस्वी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीची (Mahendra Singh Dhoni) जर्सी क्रमांक 7 देखील निवृत्त केली जाणार आहे. बीसीसीआयने हा निर्णय घेत धोनीच्या कर्तृत्वाला सलाम केला आहे. 'इंडियन एक्सप्रेस'नं दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयने महेंद्रसिंग धोनीची लोकप्रिय आणि प्रतिष्ठेची 7 नंबरची त्याच्या सन्मानार्थ निवृत्त केली आहे. यापूर्वी बीसीसीआयने 2017 मध्ये सचिन तेंडुलकरची 10 नंबरची निवृत्त केली होती.






BCCI ची 7 नंबरची जर्सी निवृत्त


वृत्तानुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, बीसीसीआयने सर्व खेळाडूंना आधीच कळवले आहे की आता त्यांच्याकडे 10 क्रमांकासह 7 क्रमांकाची जर्सी घालण्याचा पर्याय नाही. BCCI ने भारतीय क्रिकेट संघातील सध्याचे खेळाडू आणि सर्व नवीन येणाऱ्या युवा खेळाडूंना महेंद्रसिंह धोनीची ऐतिहासिक जर्सी क्रमांक 7 वापरू नये असे कळवले आहे. धोनीच्या भारतीय क्रिकेटमधील योगदानामुळे बीसीसीआयने त्याचा जर्सी क्रमांक निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे.


महेंद्रसिंग धोनीने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना न्यूझीलंडविरुद्ध 2019 एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत खेळला होता. त्या सामन्यात धोनी टीम इंडियाला विजय मिळवून देऊ शकला नाही. त्यानंतर एक वर्षाने 15 ऑगस्ट 2020 रोजी महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला.




धोनी भारतासाठी सर्वात यशस्वी कर्णधार 


धोनी भारतासाठी सर्वात यशस्वी कर्णधार आहे. तो जगातील एकमेव कर्णधार आहे ज्याने तीनही मोठ्या ICC स्पर्धा, T20 विश्वचषक, एकदिवसीय विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपल्या संघाला विजय मिळवून दिला आहे. याशिवाय धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया टेस्ट फॉरमॅटमध्ये नंबर-1 टीम बनली आहे. त्याच्या नेतृत्वाखालील एका काळात टीम इंडिया तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर-1 असायची. धोनीच्या या योगदानाचा गौरव करण्यासाठी बीसीसीआयने त्याची जर्सी क्रमांक 7 निवृत्त केली आहे.


धोनीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील विक्रम


महेंद्रसिंग धोनीने त्याच्या कारकिर्दीत एकूण 90 कसोटी, 350 एकदिवसीय आणि 98 टी-20 सामने खेळले. या फॉरमॅटमध्ये, धोनीने अनुक्रमे 38.09 च्या सरासरीने 4876 धावा, 50.57 च्या सरासरीने 10,773 धावा आणि 37.60 च्या सरासरीने 1617 धावा केल्या. याशिवाय धोनीने यष्टिरक्षक म्हणून कसोटीत 256 झेल आणि 38 स्टंपिंग केले होते. त्याच वेळी, एकदिवसीय सामन्यात धोनीने 321 झेल आणि 123 स्टंप आऊट घेतले, तर टी-20 मध्ये त्याने 57 झेल आणि 34 स्टंप आऊट घेतले.


इतर महत्वाच्या बातम्या