रांची: रांचीच्या चौथ्या वन डेत न्यूझीलंडच्या 261 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघानं अक्षरश: नांगी टाकली. विराट कोहली आणि रहाणेचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर जम बसवता आला नाही.

- रांची वनडेमध्ये भारताचा 19  धावांनी पराभव

- LIVE: भारत पराभवाच्या उंबरठ्यावर, नऊ गडी बाद

-LIVE: भारताचा सातवा गडी बाद, हार्दिक पंड्या बाद


159 धावांमध्येच भारतानं आपले सहा गडी गमावले. यात रहाणेनं 57 धावा केल्या तर विराटनं 45 धावांची खेळी केली. दुसरीकडे रांचीच्या चाहत्यांना धोनीची फटकेबाजी मात्र पाहायला मिळाली नाही. धोनी अवघ्या 11 धावा करुन बाद झाला.

रोहित शर्मा, मनीष पांडे आणि केदार जाधव हे किवी गोलंदाजीसमोर सपशेल अपयशी ठरले. सध्या हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल खेळत असून 34.2 षटकात भारतानं 160 धावा केल्या आहेत.

- LIVE: भारताला सहावा धक्का, केदार जाधव शून्यावर बाद

- LIVE: टीम इंडियाचा पाचवा गडी बाद, मनीष पांडे 12 धावांवर बाद

- LIVE: भारताला मोठा धक्का, कर्णधार धोनी ११ धावांवर बाद, इंडिया 135/4


- LIVE: अजिंक्य रहाणे 57 धावांवर बाद, भारताला तिसरा धक्का, इंडिया 128/3 (27.3)


- LIVE: अजिंक्य रहाणेनं झळकावलं शानदार अर्धशतक, 61 चेंडूत 51 धावा


- LIVE: भारताचा दुसरा गडी बाद, विराट कोहली 45 धावांवर बाद, इंडिया 122/2 (25.0)


- LIVE: भारताला पहिला धक्का, रोहित शर्मा 11 धावांवर बाद 

रांचीच्या चौथ्या वन डेत न्यूझीलंडनं भारताला 261 धावांचं आव्हान दिलंय. या सामन्यात न्यूझीलंडनं 50 षटकांत 7 बाद 260 धावा केल्या. सलामीवीर मार्टिन गप्टिल आणि टॉम लॅथमची 96 धावांची भागीदारी आणि विल्यमसनच्या 41 धावांच्या खेळीमुळं न्यूझीलंडला ही मजल मारता आली.

भारताकडून अमित मिश्रानं दोन तर उमेश यादव, धवल कुलकर्णी, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेलनं प्रत्येकी एक विकेट काढली. 


भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथा वन डे सामना आज रांचीत होत आहे. या सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

भारतीय संघात जसप्रीत बुमराहच्या जागी धवल कुलकर्णीचा समावेश करण्यात आला आहे.


रांचीचा सुपुत्र आणि टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची कामगिरी हे भारत आणि न्यूझीलंडच्या संघांमधला चौथ्या वन डे सामन्याचं मुख्य वैशिष्ट्य ठरू शकतं. हा सामना आज रांचीमध्ये झारखंड क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात खेळवण्यात येत आहे.

टीम इंडियानं मोहालीची तिसरी वन डे जिंकून या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. मोहालीच्या मैदानात भारताच्या विजयात धोनीनंही महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानं आधी अमित मिश्राच्या गोलंदाजीवर रॉस टेलर आणि ल्यूक रॉन्कीला यष्टीचीत केलं. मग चौथ्या क्रमांकावर खेळताना धोनीनं 91 चेंडूंमध्ये 80 धावांची खेळी करून विराटच्या साथीनं चौथ्या विकेटसाठी 151 धावांची भागीदारी रचली होती. धोनीला दीर्घ कालावधीनंतर एक फलंदाज म्हणून गवसलेला फॉर्म टीम इंडियासाठी सुखावह ठरावा.

साहजिकच आता रांचीला आपल्या घरच्या मैदानात धोनी काय कामगिरी बजावतो यावर सर्वांची नजर राहील. रांचीचा हा सामना जिंकून मालिकाही खिशात टाकण्याची संधी धोनीच्या टीम इंडियाकडे आहे.