मुंबईः एकात्मिक बालविकास सेवा योजनेतील अंगणवाडी सेविकांना एक हजार रुपये भाऊबीज भेट देण्यात आली आहे. महिला बालविकास विभागाने या बाबतीत परिपत्रकाद्वारे माहिती दिली.
अंगणवाडी सेविकांना दरवर्षी दिवाळीच्या बोनसची मागणी करावी लागते. त्यासाठी आंदोलनाची देखील वेळ येते. या वर्षासाठी अंगणवाडी सेविकांना भाऊबीज भेट देण्याचा विषय सरकारच्या विचाराधीन होता. त्यामुळे बोनस जाहीर केला, असं परिपत्रकात म्हटलं आहे.
मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांसह, मदतनिस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. बोनसची रक्कम दिवाळीपूर्वी देण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.