बंगळूर : करो वा मरो अशा स्थितीत पोहोचलेल्या पाकिस्तानला आज न्यूझीलंडने 401 धावांचा तडाखा दिला. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांची चौफेर धुलाई केली. त्यामुळे आता पाकिस्तानसाठी स्पर्धेत आव्हान जिवंत ठेवण्यासाठी 402 दोन धावांचं आव्हान पार करावं लागणार आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या किवी संघाने 50 षटकांत 6 बाद 401 धावा केल्या.

  






न्यूझीलंडकडून रचिन रवींद्रने शानदार शतकी खेळी खेळली. रचिन रवींद्रने 94 चेंडूत 108 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 15 चौकार आणि 1 षटकार मारला. वयाची 24 सुद्धा पार न केलेल्या रचिन रविंद्रने आतापर्यंत वर्ल्डकपमध्ये तीन शतके झळकावून थेट सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला. सचिन तेंडुलकरच्या नावे वयाच्या चोविशीत दोन शतकांची नोंद आहे. याशिवाय न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने 79 चेंडूत 95 धावांचे योगदान दिले. त्याने आपल्या खेळीत 10 चौकार आणि 2 षटकार मारले. पाकिस्तानकडून मोहम्मद वसीम ज्युनियर हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. मोहम्मद वसीम ज्युनियरने 10 षटकात 60 धावा देत 3 खेळाडूंना आपला बळी बनवले.






न्यूझीलंडची वनडे इतिहासातील दुसरी सर्वोच्च धावसंख्या


त्याचबरोबर न्यूझीलंडच्या वनडे इतिहासातील ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी 2008 मध्ये न्यूझीलंडने आयर्लंडविरुद्ध 50 षटकांत 2 बाद 402 धावा केल्या होत्या. आज पाकिस्तानविरुद्ध 50 षटकांत 6 गडी गमावून 401 धावा केल्या. तर 2015 मध्ये इंग्लंडविरुद्ध 398 धावा केल्या होत्या. 






2005 मध्ये बुलावायो येथे किवी संघाने झिम्बाब्वेविरुद्ध 5 विकेट्सवर 397 धावा केल्या होत्या. याशिवाय 2015 साली वेस्ट इंडिजविरुद्ध 6 गडी गमावून 393 धावा केल्या होत्या.






इतर महत्वाच्या बातम्या