महाड, रायगड : महाडमधील केमिकल कंपनीत (Mahad Fire) लागलेल्या अग्नितांडवात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यूदेह हाती आले आहेत. तर दोन कामगार अजूनही बेपत्ता आहेत. जवळपास 10 तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. महाडमधील ब्लू जेट केमिकल कंपनीत (Blue Jet Healthcare company fire) शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास आग लागली होती. या कंपनीत आधी स्फोट होऊन आग लागली, त्यामुळे 11 कामगार अडकले होते. तर पाच जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जे कामगार कंपनीत अडकले होते, त्यापैकी 9 जणांचे मृतदेह हाती आले आहेत. शुक्रवारी संध्याकाळी 7 तर आज सकाळी 2 मृतदेह सापडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या स्फोटाची भीषणता पाहून कालच NDRF च्या पथकाला पाचारण करण्यात आले होते. 


NDRF चे सर्च ऑपरेशन (NDRF Search operation at Mahad)  


दरम्यान, काल सकाळी स्फोटानंतर कंपनीत अडकलेल्या कर्मचाऱ्यांचा काहीच पत्ता लागत नसल्याने NDRF पथक बोलावण्यात आलं होतं. शुक्रवारी संध्याकाळी हे पथक घटनास्थळी दाखल झालं. या पथकाने रात्री 11.30 च्या सुमारास कंपनीत ज्या ठिकाणी स्फोट झाला, त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरु केलं. त्यावेळी त्यांना आधी 4 मृतदेह सापडले. नंतर एक एक करुन आणखी 3 मृतदेह हाती लागले. त्यानंतर आज आणखी दोन कर्मचाऱ्यांचे मृतदेह आढळून आल्याने, 11 पैकी 9 कामगारांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. 


रात्री काय काय घडलं? (Mahad Fire update)



  • महाड एमआयडीसीमधील ब्ल्यू जेट हेल्थकेअर कंपनीतील एका प्लांटमध्ये शुक्रवारी सकाळी स्फोट झाला. या स्फोटामध्ये 11 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात होती. 

  • सकाळी साडेदहावाजता स्फोट झाल्यानंतर जवळपास बारा तासानंतरही आपल्या माणसांची कोणतीही अधिकृत माहिती प्रशासन, नातेवाईकांना देत नसल्याने नातेवाईकांनी गदारोळ केला.  

  • नातेवाईकांची पोलीस प्रशासनासोबत बाचाबाची झाली. 

  • त्यानंतर राज्याचे उद्योगमंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत हे पहाटे साडेतीन वाजता MIDC मध्ये येऊन त्यांनी कामगारांच्या नातेवाईकांशी चर्चा केली.

  • संतापलेले नातेवाईक कंपनीच्या गेटवर चढून आत गेले. 

  • संतापलेल्या नातेवाईकांना शांत करण्यासाठी NDRF अधिकाऱ्यांनीही चर्चा केली. 


 आमदार भरत गोगावले यांचं आवाहन (Bharat Gogawale appeal)


दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी घटनास्थळी भेट दिली. मृतांच्या नातेवाईकांना कंपनीतर्फे 30 लाख रुपये, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाख रुपये आणि विमा कंपनीच्या माध्यमातून 9 ते 18 लाख, अशी एकूण 45 लाखांपर्यत मदत मिळवून देऊ, अशी माहिती आमदार भरत गोगावले यांनी दिली.   


VIDEO :  भरत गोगावले काय म्हणाले?



संबंधित बातम्या