Food Items Named After Celebrities: बॉलिवूडमधील सेलिब्रिटींच्या चाहता वर्ग मोठा आहे. अनेक चाहते हे बॉलिवूड कलाकारांच्या नावाचा टॅटू काढतात. पण काही हॉटेल्समधील  चविष्ट पदार्थांना  बॉलिवूड कलाकारांची नावं देण्यात आली आहे (Food Items Named After Celebrities). एका रेस्टॉरंटमध्ये चिकनच्या डिशला संजय दत्तचं (Sanjay Dutt) नाव देण्यात आलं आहे तर एका हॉटेलमधील चापला अभिनेत्री सनी लिओनीचं (Sunny Leone) नाव देण्यात आलं आहे. जाणून घेऊयात अशा पदार्थांबद्दल...


चिकन संजू बाबा (Chicken Sanju Baba)


चिकन संजू बाबा या नावाची डिश ही मुंबई येथील मोहम्मद अली रोड या परिसरातील नूर मोहम्मदी हॉटेलमध्ये मिळते. 2010 पासून मसालेदार ग्रेव्हीसह मिळाणारी ही  चिकन संजू बाबा डिश खवय्यांसाठी उपलब्ध आहे. चिकन संजू बाबा डिश या पदार्थानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


सनी लियोनी मलाई चाप (Sunny Leone Chaap)


दिल्लीमधील मालवीय नगरमधील एका रेस्टॉरंटमध्ये सनी लियोनी मलाई चाप ही डिश मिळते. या हॉटेलमध्ये 50 पेक्षा जास्त प्रकारचे चाप खवय्यांसाठी उपलब्ध आहेत. यामधील एका चापला अभिनेत्री सनी लियोनीचं नाव देण्यात आलं आहे.


कार्तिक आर्यन ( Kartik Aaryan)


मॅकडोनाल्डच्या एका मिलला कार्तिक आर्यनचं नाव देण्यात आलं आहे. 


दीपिका पादुकोण डोसा (Deepika Padukone Dosa)


दीपिका पदुकोणचा चाहता वर्ग मोठा आहे. ऑस्टिन, टेक्सास येथील डोसा लॅबमध्ये एका डोसाचे नाव दीपिका पदुकोणच्या नावावर ठेवण्यात आले आहे.  दीपिका पदुकोणनेही डोसाचे नाव तिच्या नावावर असल्याचे कळताच याबाबत ट्वीट देखील केले होते. तसेच रणवीर सिंहनं देखील मेन्यू कार्डचा एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये 'दीपिका पदुकोण डोसा' असं लिहिलेलं दिसले.


सोनम कपूर केक (Sonam Kapoor)


मुंबईच्या प्रसिद्ध बेकरीने मँगो ब्लूबेरी केकचे नाव सोनम स्पेशल केक म्हणून ठेवले. आजही हा केक सोनम कपूरच्या नावानेच विकला जातो.


पुण्यातील रेस्टॉरंटमध्ये पदार्थांची भन्नाट नावं


पुण्यातील आओजी खावजी या रेस्टॉरंटमध्ये देखील कलाकारांच्या नावाच्या डिश  खवय्यांसाठी उपलब्ध आहेत.अल्लू अर्जुन थाळी, सुपरस्टार प्रभास थाळी, द लेजेंडरी राज कुमार थाळी, अक्षय कुमार पनीर टिक्का, अजय देवगण पनीर टिक्का, माधुरी दीक्षित पनीर टिक्का अशी नावे या पदार्थांची आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या:


Bollywood Kissing Scenes : दिपिका ते माधुरी ते पार डिपल कपाडियापर्यंत! या चित्रपटात डायरेक्टर कट कट म्हणतो, तरी किसिंग सीन होतच राहिले!