तिसऱ्या दिवसासाठी भारतीय खेळाडूंच्या खाण्यामध्ये बीफचाही समावेश होता. बीसीसीआयने मेन्यूचा फोटो ट्विटरवर शेअर केला. हा फोटो पाहताच बीसीसीआयला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. ब्रेज्ड बीफ पास्ता या पदार्थावरुन बीसीसीआयवर टीका करण्यात आली.
लॉर्ड्सवर सुरु असलेल्या कसोटीत जेवणात जो मेन्यू असतो, त्याचा फोटो बीसीसीआयकडून दररोज शेअर केला जातो. पहिल्या दिवशी सूप, चिकन लसाने, स्टफ्ड लँब, चिकन टिक्का करी, पनीर टिक्का असे पदार्थ होते. तर दुसऱ्या दिवशीही विविध पदार्थ होते. मात्र तिसऱ्या दिवशीच्या पदार्थांवरुन नवा वाद सुरु झाला.