नवी मुंबई : सिडको (शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ) च्या माध्यमातून घरांची बम्पर लॉटरी जाहीर होणार आहे. सिडकोने एकाच वेळी तब्बल 14 हजार 838 घरांची लॉटरी काढली असून याचा फायदा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आणि अल्प उत्पन्न गटासाठी होणार आहे.


नवी मुंबईतील घणसोली, खारघर, कळंबोली, तळोजा, द्रोणागिरी या भागात सिडकोने घरे उभारलेली आहेत. एमएमआरडीए रेंजमध्ये म्हणजेच मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली भागात ज्यांच्या नावावर घर आहे, त्यांना या घराचा लाभ घेता येणार नाही.

येत्या 13 ऑगस्ट रोजी घरांची लॉटरी निघणार आहे. यासाठी 15 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 18 लाखांचे घर असून 25.81 चौ.मी. एवढं क्षेत्र आहे. तर अल्प उत्पन्न गटासाठी 26 लाखांच्या घराचा एरिया 29.82 चौ.मी. आहे. लॉटरीच्या माध्यमातून काढण्यात येणाऱ्या या घरांचा ताबा 2019 च्या शेवटी देण्यात येणार आहे.

आर्थिक दुर्बल गटासाठी उत्पन्न मर्यादा ही 25 हजार रूपये प्रति महिना ठेवण्यात आली आहे. अल्प उत्पन्न गटासाठी ही मर्यादा 25 हजार ते 50 हजार रुपये प्रति महिना ठेवण्यात आली आहे. 50 हजार रूपयांपेक्षा जास्त पगार असणाऱ्या व्यक्तिंना या योजनेत सहभागी होता येणार नाही. या घरांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेता येणार आहे.

एकूण घरे : 14 हजार 838

  • आर्थिक दुर्बल घटकांसाठी : 5 हजार 262

  • अल्प उत्पन्न गटासाठी : 9 हजार 576


अनामत रक्कम किती?

  • आर्थिक दुर्बल गट : अनामत रक्कम 5 हजार रुपये, अर्ज शुल्क 280, एकूण - 5280

  • अल्प उत्पन्न गट : अनामत रक्कम 25 हजार रुपये, अर्ज शुल्क 280, एकूण - 25280


कोणत्या भागात किती घरे?

  • आर्थिक दुर्बल गट : तळोजा 2862, खारघर 684, कळंबोली 324, घणसोली 528, द्रोणागिरी 864

  • अल्प उत्पन्न गट : तळोजा 5232, खारघर 1260, कळंबोली 582, घणसोली 954, द्रोणागिरी 1548


अर्ज भरण्याची तारीख : 15 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर