नरसिंग यादवला नाडाकडून मोठा दिलासा, बंदी हटवली
एबीपी माझा वेब टीम | 01 Aug 2016 11:56 AM (IST)
मुंबई: महाराष्ट्राचा पैलवान नरसिंग यादवला नाडाकडून मोठा दिलासा मिळाला असून त्याच्यावरुन बंदी हटवण्यात आली आहे. उत्तेजक सेवन चाचणीत दोषी सापडल्यानंतर नरसिंग यादवनं त्याच्या खाण्यात काहीतरी मिसळण्यात आल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी आज निकाल देण्यात आला. त्यामध्ये नरसिंगला मोठा दिलासा मिळाला आहे. 25 जून आणि 5 जुलै रोजी झालेल्या तपासणीत नरसिंगच्या अ आणि ब नमुन्यांत मेटँडिएनोन या स्टेरॉईडचा अंश आढळून आला होता. नरसिंगनं मात्र त्याच्या खाण्यात काहीतरी मिसळण्यात आल्याचा आरोप केला होता. त्याप्रकरणी हरयाणा पोलिसांनी चौकशीही केली. त्यानंतर नाडासमोरही नरसिंगची सुनावणी झाली. त्यानंतर नाडानं आज दिलेला हा निकाल नरसिंग यादवला मोठा दिलासा मिळाला आहे.