नवी दिल्ली : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीवर त्याच्याच पत्नीने मॅच फिक्सिंग सारखे गंभीर आरोप केले आहेत. या सर्व आरोपांनंतर शमीने देखील माध्यमांसमोर येऊन आपली बाजू मांडली आहे.

एबीपी न्यूज नेटवर्कशी बोलताना शमी म्हणाला की, 'यासाठी तिला (हसीन जहां) पुरावे द्यावे लागतील. कारण की, हा देशाविषयीचा प्रश्न आहे. माझं संपूर्ण कुटुंब हसीनशी संपर्क करण्याचा प्रयत्न करीत आहे. पण तिच्याशी अद्यापही संपर्क होऊ शकलेला नाही. मला वाटतं तिचं मानसिक संतुलन बिघडलं आहे.'

दरम्यान, हसीन जहांने केलेले सर्व आरोप यावेळी शमीने फेटाळले आहेत. 'ती सलग कोणत्याही पुराव्यांशिवाय माझ्यावर आरोप करत आहे. तिला अचानक काय झालं हेच मला समजत नाही. जर सर्व काही तीन वर्षापासून सुरु होतं. तर तिने सर्व गोष्टी आधीच सांगायला हव्या होत्या.' असंही शमी म्हणाला.

'मला असं वाटतं की, तिच्या डोक्यात काहीतरी मोठा कट सुरु आहे. आम्हाला असं वाटतं की, घरातील समस्या घरातच सोडवल्या गेल्या पाहिजेत. पण तिने जर कायदेशीर लढाई लढण्याचा निर्णय घेतला असेल तर मी देखील तिला आता कायदेशीर उत्तरच देईन.' असं म्हणत शमीने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान याचवेळी शमीने कॉन्ट्रॅक्ट खेळाडूंच्या यादीत स्थान न मिळाल्याबाबतही प्रतिक्रिया दिली. 'कॉन्ट्रॅक्ट खेळाडूंच्या यादीतून स्थान न मिळाल्याने मला मोठा धक्का बसला. पण मला बीसीसीआयवर पूर्ण विश्वास आहे. मला आशा आहे की, बीसीसीआय याची संपूर्ण चौकशी करेल. करिअरच्या दृष्टीने ही प्रचंड वाईट गोष्टी आहे. मला असं वाटतं की, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी.' असंही शमी यावेळी म्हणाला.

VIDEO :


शमीचा मॅच फिक्सिंगमध्ये हात? पत्नी हसीन जहाँच्या आरोपांनी खळबळ

पाकिस्तानी युवतीकडून पैसे घेतल्याचा गंभीर आरोप शमीची पत्नी हसीन जहाँने करुन, अप्रत्यक्षपणे मॅच फिक्सिंग केल्याची शंका व्यक्त केली आहे.

“शमीने पाकिस्तानातील एका तरुणीकडून पैसे घेतले, जे इंग्लंडहून पाठवण्यात आले होते. ते पैसे का पाठवण्यात आले होते? बीसीसीआयने बुक केलेल्या हॉटेलमध्ये एखादी अनोळखी तरुणी कशी पोहोचते?”, असे गंभीर प्रश्न हसीनने उपस्थित केले आहेत.

“पाकिस्तानातील कराचीमध्ये राहणाऱ्या त्या तरुणीला शमी बोलवतो. तिच्यासाठी खास रुम बुक करतो. तिच्यासोबत त्याचे संबंध आहेत. तिच्यामार्फत इंग्लंडमधील कुणीतरी मोहम्मद भाईने पैसे पाठवल्याचे तो सांगतो. मात्र ते पैसे कसले आहेत, का दिले, याची माहिती त्याने मला अद्याप कधीच सांगितले नाही.”, असेही हसनीने एबीपी न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितले.

“अल्ला करो नि असे होऊ नये, पण तो काहीतरी फ्रॉड करु शकतो, तो देशासोबतही गद्दारी करु शकतो. माझ्याकडे पुरावे आहेत. तुम्हीही दुबईत त्या हॉटेलमध्ये जाऊन पाहू शकता की, त्याने सिंगल अॅडल्टच्या नावे बुकिंग केली होती की नाही. कोणत्या गोष्टीचे शमीने पैसे घेतले? शमीसोबत मी बोलले, त्यावेळेचं माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, ज्यात त्याने पैसे घेतल्याचे मान्य केले आहे.”, असे हसीने सांगितले.

संंबंधित बातम्या :

शमीचा मॅच फिक्सिंगमध्ये हात? पत्नी हसीन जहाँच्या आरोपांनी खळबळ

शमीविरुद्ध माझ्याकडे पुरावे, आता त्याला कोर्टातच खेचेन : हसीन जहां

बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्ट खेळाडूंच्या यादीतून शमीचं नाव वगळलं

VIDEO : थेट कॅमेऱ्यासमोर येत हसिन जहांचे शमीवर गंभीर आरोप

पत्नीच्या आरोपांवर मोहम्मद शमीचं स्पष्टीकरण

मोहम्मद शमीवरील आरोपांवर बीसीसीआयची प्रतिक्रिया

अनेक तरुणींशी शमीचे अनैतिक संबंध, पत्नीचा फेसबुकवर आरोप