मुंबई : मुंबईचा उदयोन्मुख सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉच्या खांद्यावर नवी जबाबदारी सोपवली गेली आहे. भारताच्या अंडर नाईन्टीन विश्वचषक संघाच्या कर्णधारपदाची धुरा पृथ्वीवर सोपवण्यात आली आहे.
एकोणीस वर्षांखालील वयोगटाच्या विश्वचषकाचं 13 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या कालावधीत न्यूझीलंडमध्ये आयोजन करण्यात आलं आहे. या विश्वचषकासाठी भारताच्या सोळा सदस्यीय संघाची रविवारी निवड करण्यात आली. या संघाच्या नेतृत्त्वाची सूत्रं पृथ्वी शॉच्या हाती देण्यात आली आहेत.
आजवरच्या इतिहासात भारतानं तीन वेळा अंडर 19 विश्वचषक पटकावला आहे. ऑस्ट्रेलियाच्या बरोबरीने सर्वाधिक वेळा वर्ल्डकप मिळवण्याचा मान अंडर 19 टीम इंडियाला मिळाला आहे. 2000, 2008 आणि 2012 साली अंडर नाईन्टीन विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आहे.
गेल्या वर्षी बांगलादेशमध्ये झालेल्या अंतिम फेरीत विंडीजकडून भारताला हार पत्करावी लागली होती.
19 वर्षांखालील वर्ल्डकप टीम
पृथ्वी शॉ (कर्णधार)
शुभम गिल (उपकर्णधार)
मनज्योत कालरा
हिमांशू राणा
अभिषेक शर्मा
रियान पराग
आर्यन जुयल (विकेटकीपर)
हार्विक देसाई (विकेटकीपर)
शिवम मावी
कमलेश नागरकोटी
इशान पोरेल
अर्शदीप सिंग
अनुकूल रॉय
शिवा सिंग
पंकज यादव
अंडर 19 विश्वचषकाच्या कर्णधारपदाची धुरा पृथ्वी शॉच्या खांद्यावर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Dec 2017 05:54 PM (IST)
एकोणीस वर्षांखालील वयोगटाच्या विश्वचषकाचं 13 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या कालावधीत न्यूझीलंडमध्ये आयोजन करण्यात आलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -