क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने काल म्हणजेच 24 एप्रिलला 44 वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने मुंबई इंडियन्सने खास पद्धतीने त्याला वाढदिवस साजरा करण्याचा प्लॅन केला होता.
मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाने सचिनचा 44 वा वाढदिवस घरच्या प्रेक्षकांमध्ये, मुंबईतील वानखडे स्टेडिअमवर केक कापून साजरा केला.
सचिन तेंडुलकरने मुंबई इंडियन्सच्या डग आऊटमध्ये केक कापला. यावेळी त्याच्यासोबत ऑस्ट्रेलियाचा माजी स्फोटक फलंदाज मॅथ्यू हेडन होता.
यावेळी उपस्थित प्रेक्षकांनी सचिन... सचिन... घोषणा देऊन त्याला शुभेच्छा दिल्या.
केक कापण्याआधी सचिन मॅथ्यू हेडनला म्हणाला की, 'हा अतिशय खास क्षण आहे. मला वाटलेलं आपण एखाद्या खोलीत शांततेत केक कापू. पण मी कधीच विचार केला नव्हता की, वाढदिवसाला स्टेडियममध्ये केक कापेन आणि संपूर्ण स्टेडियम माझ्यासाठी गाणं गाईल.'
पाहा व्हिडीओ