मुंबई : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड करण्यासाठी 19 जुलै रोजी निवड समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक आता 20 जुलै रोजी होण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर बीसीसीआयकडून एकदिवसीय आणि टी20 मालिकेसाठीच्या भारतीय संघाची घोषणा होऊ शकते.


सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विराट कोहली संघाच्या कर्णधारपदावर कायम राहील. तर माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीला या मालिकेत आराम दिला जाण्याची शक्यता आहे. धोनीच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे धोनीला आराम दिला जाणार आहे. दरम्यान, धोनी सध्या खराब फॉर्ममध्ये असल्यामुळे त्याला आराम दिला जाणार असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. परंतु या अफवा खोट्या असून धोनीची दुखापत आणि सातत्याने खेळत असल्यामुळे आलेला थकवा या कारणांमुळे त्याला आराम दिला जाणार आहे.

जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह याला एकदिवसीय आणि टी20 मालिकेसाठी विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. तसेच सलामीवीर शिखर धवन अंगठ्याच्या दुखापतीमधून सावरलेला नाही. त्यामुळे या मालिकेत त्यालादेखील आराम दिला जाणार आहे. या दुखापतीमुळेच शिखरला विश्वचषक स्पर्धा अर्ध्यावर सोडून मायदेशी परतावे लागले होते.

निवृत्तीबाबत धोनी म्हणतो...

अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याच्या फिटनेसबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आयपीएल संपल्यापासून तो त्याच्या फिटनेसशी झुंजतोय. त्याचबरोबर विश्वचषक स्पर्धेतील खराब प्रदर्शनानंतर केदार जाधव आणि दिनेश कार्तिक या दोघांना डच्चू दिला जाणार आहे.

MS Dhoni Retirement : धोनीच्या अखेरच्या सामन्याविषयी बीसीसीआयच्या अधिकाऱ्याचं भाकित

दरम्यान, आयपीएल आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर या दोन नव्या खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. 3 ऑगस्टपासून वेस्ट इंडिज दौऱ्याला सुरुवात होणार आहे.

पाहा व्हिडीओ : धोनी निवृत्ती केव्हा घेणार?



 महेंद्रसिंह धोनी भाजपमध्ये प्रवेश करणार? भाजप नेत्याचा दावा खरा? | ABP Majha