मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीवर टीका केल्याने सचिन तेडुंलकरला नेटिझन्सने ट्रोल केलं आहे. अफगाणिस्थान विरुद्ध धोनी संथगतीने फलंदाजी करत 52 चेंडूत 28 धावा केल्या होत्या. धोनीच्या या खेळीवर सचिनने नाराजी व्यक्त केली होती.


'अफगाणिस्थान विरुद्ध आपल्याला चांगली धावसंख्या उभारता आली असती. धोनी आणि केदार जाधवच्या भागीदारीबद्दलही नाराज आहे. मधल्या फळीत धोनी आणि केदारने चांगली भागिदारी केली परंतु दोघांनी खूपच संथ धावा केल्या. भारतीय संघ मधल्या फळीमध्ये कमकुवत दिसतो. अफगाणिस्तानने दोन वेळा विश्वविजेत्या संघाला अवघ्या 224 धावांत रोखलं. मधल्या फळीतील फलंदाजांकडे सकारात्मक इच्छाशक्तीचा आभाव वाटला, असं सचिनने म्हटलं होतं.


सचिनवर टीका करताना एकाने म्हटलं की, "सचिन तू धोनीमुळेच वर्ल्ड कप जिंकला आहेस"





"दबावाखाली धोनी हा सचिनपेक्षा चांगलाच खेळतो" अशी तुलना धोनी आणि सचिनची एकाने केली.





"धोनीचं काम काय आहे? आणि त्यानं ते कसं करायचं हे कोणी त्याला शिकवू नये" असा सल्ला एकाने धोनी टीकाकारांना दिला.





एकाने म्हटलं की, "धोनी क्रिकेटचा बादशाह आहे तर सचिन केवळ स्वत:साठी खेळला", "2003 आणि 2011 च्या विश्वचषक फायनलमध्ये सचिनने एकून 22 धावा केल्या, तर धोनीने 2011 च्या फायनलमध्ये 94 धावा केल्या"