शमीच्या चौकशीसाठी बीसीसीआयच्या अँटी करप्शन युनिटला या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. चौकशीअंती अँटी करप्शन युनिटने शमीला क्लीन चिट दिली आहे. तसंच त्याला बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये बी श्रेणीत स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे आता शमीला 3 कोटीचं मानधन मिळणार आहे.
शमीची पत्नी हसीन जहां हिने शमीवर मॅच फिक्सिंगसारखे गंभीर आरोप केले होते. हसीनने असाही दावा केला होता की, लंडनमध्ये राहणाऱ्या मोहम्मद भाई आणि पाकिस्तानी तरुणी अलिश्बा यांच्यासोबत शमीचे पैशाचे व्यवहार होते.
या प्रकरणातील गंभीरता लक्षात घेत बीसीसीआयने शमीला कॉन्ट्रॅक्ट यादीतून वगळलं होतं आणि त्याच्या चौकशीसाठी अॅण्टी करप्शन युनिट स्थापन करण्यात आलं होतं. या संपूर्ण प्रकरणी अॅण्टी करप्शन युनिटने शमीच्या पत्नीचीही चौकशी केल होती. पण आता शमीला क्लीन चिट मिळाल्यामुळे त्याचा भारतीय संघात आणि आयपीएलमध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
6 मार्चला मोहम्मद शमीवर त्याच्या पत्नीने सोशल मीडियाच्या माध्यमातून गंभीर आरोप केले होते. तसंच तिने कोलकातामध्ये शमी आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात तक्रारही नोंदवली होती.
संबंधित बातम्या