नवी दिल्ली : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीवर त्याच्याच पत्नीने गंभीर आरोप केले आहेत. शमीचे अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप पत्नी हसीन जहांने केला. शमीचे अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध आहेत, असा थेट आरोप तिने केला.

शमीवर झालेल्या या आरोपांमुळे मोठा फटका त्याला बसला आहे. कारण, बीसीसीआयने आजच कॉन्ट्रॅक्ट खेळाडूंच्या यादीतून त्याला वगळलं आलं आहे. शमीला नेमकं का वगळलं याचं कारण स्पष्ट नसलं तरी एकूणच त्याला या प्रकाराचा फटका बसला आहे.

बीसीसीआयकडून कॉन्ट्रॅक्ट खेळाडूंची नवीन यादी जाहीर करण्यात आली. या यादीत 27 खेळाडूंचा समावेश असून त्यांची ए प्लस, ए, बी आणि सी अशा चार श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर खेळाडूंच्या मानधनात बीसीसीआयने तब्बल 200 टक्क्यांनी वाढ केली आहे.

या कॉन्ट्रॅक्टमध्ये  ए प्लस श्रेणीतील खेळाडूंना 7 कोटी, ए श्रेणीच्या खेळाडूंना 5 कोटी, बी श्रेणीच्या खेळाडूंना 3 कोटी तर सी श्रेणीच्या खेळाडूंना 1 कोटींचं मानधन जाहीर करण्यात आलं आहे. या यादीत ए प्लस श्रेणीत विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराचा समावेश करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

VIDEO : थेट कॅमेऱ्यासमोर येत हसिन जहांचे शमीवर गंभीर आरोप


पत्नीच्या आरोपांवर मोहम्मद शमीचं स्पष्टीकरण


मोहम्मद शमीवरील आरोपांवर बीसीसीआयची प्रतिक्रिया


अनेक तरुणींशी शमीचे अनैतिक संबंध, पत्नीचा फेसबुकवर आरोप