नवी दिल्ली : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि यष्टिरक्षक रिद्धिमान साहाने दुखापतीमुळे चेन्नई कसोटीतून माघार घेतली आहे. भारत आणि इंग्लंड संघांमधली पाचवी आणि अखेरची कसोटी 16 ते 20 डिसेंबर या कालावधीत चेन्नईत खेळवली जाणार आहे.
शमी आणि साहाने दुखापतीमुळे मुंबई कसोटीतूनही माघार घेतली होती. राजकोट कसोटीदरम्यान मोहम्मद शमीच्या उजव्या पायाला दुखापत झाली होती. पण त्यानंतरही शमी विशाखापट्टणम आणि मोहाली कसोटीत खेळला होता. तर विशाखापट्टणच्या दुसऱ्या कसोटीदरम्यान साहाच्या पायाचे स्नायू दुखावले होते.
दरम्यान साहाच्या जागी पार्थिव पटेलचा संघात अगोदरच समावेश करण्यात आला आहे. तर शमीच्या जागी मुंबई कसोटीवेळी शारदुल ठाकूरचा समावेश करण्यात आला.