लातूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लातूर येथील सभेत काही तरुणांनी सभा सुरु होताच मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी केल्याने एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी तातडीने 13 जणांना ताब्यात घेत नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन केलं.


मुख्यमंत्री आज लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. औसा, निलंगा, उदगीर, अहमदपूर नगरपालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांनी प्रचार सभा घेतली. सभा सुरु झाल्यानंतर काही वेळातच गर्दीतील काही तरुणांनी उभं राहून घोषणाबाजी सुरु केली.

दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या सभेत घोषणाबाजी होण्याची दिवसभरातील ही दुसरी घटना आहे. मुख्यमंत्र्यांच्या पैठण येथील सभेत छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी यानंतर 7 जणांना ताब्यात घेतलं.

संबंधित बातमी : मुख्यमंत्र्यांच्या सभेत छावा संघटनेची घोषणाबाजी, कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात