मुंबई : तात्काळ तिहेरी तलाक घटनाबाह्य असल्याचा निर्णय देत सुप्रीम कोर्टानं देशभरातील मुस्लिम महिलांना मोठा दिलासा दिला. या निर्णयाचं देशभरात स्वागतही केलं गेलं. याचवेळी टीम इंडियाचा माजी क्रिकेटर मोहम्मद कैफनं देखील या निर्णयाचं स्वागतं केलं.
याविषयी कैफनं ट्विटरवर आपलं मतंही व्यक्त केलं. 'सुप्रीम कोर्टानं तिहेरी तलाकवर दिलेल्या निर्णयाचं मी स्वागत करतो. यामुळे मुस्लिम महिलांना सुरक्षा मिळेल. स्त्री-पुरुष समानता फार गरजेची आहे.'
पण कैफच्या या ट्वीटवर काही कट्टरतावाद्यांनी त्याला ट्रोल करणं सुरु केलं. त्यातील बऱ्याच जणांनी त्याच्याविरुद्ध काही ट्वीटही केले.
'तुम्ही कोणाला खूश करण्यासाठी असे ट्वीट करता?' असा प्रश्नही Aimim rebel ladka या ट्विटर हँण्डलवरुन विचारण्यात आला आहे.
'इस्लाममध्ये महिला सुरक्षित आहेत. एक मुस्लिम असल्यानं तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे.' असा उपदेशाचा डोसही Xahoor bhat या ट्विटर हँण्डलवरुन कैफला देण्यात आला आहे.
दरम्यान, याआधीही अनेकदा मोहम्मद कैफला ट्रोल करण्यात आलं आहे. मात्र, असं असलं तरीही कोणत्या दबावाला बळी न पडता कैफ वारंवार आपली भूमिका जगासमोर माडंतो.
संबंधित बातम्या :
तिहेरी तलाकविरोधात तातडीने कायदा करु: मेनका गांधी
Triple Talaq : 3 विरुद्ध 2 ने तलाकवर मात, कोर्ट रुम 1 मध्ये नेमकं काय घडलं?
तिहेरी तलाक : मुस्लीम महिलांचा आवाज...शायरा बानो
Triple Talaq : 5 पाईंटमध्ये समजून घ्या सुप्रीम कोर्टाचा निकाल
तिहेरी तलाकवर आजपासून बंदी: सुप्रीम कोर्ट
‘तिहेरी तलाक’ सुनावणीत आतापर्यंत नेमकं काय-काय झालं?